Siddaramaiah resignation latest news in Karnataka 
देश विदेश

मुख्यमंत्री बदलाची हालचाल सुरू, दुसरीकडे राज्यपाल 'आऊट ऑफ टाऊन'; राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट

Karnataka Political Twist: सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याबाबतच्या अटकळी वाढत असल्याने कर्नाटकात राजकीय नाट्य वाढलंय. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या अनुपस्थितीमुळे नेतृत्व बदल लांबणार आहे.

Bharat Jadhav

  • कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

  • सिद्धरामय्या राजीनामा देऊ शकतात अशी अटकळ व्यक्त होत आहे.

  • राज्यपाल थावरचंद गेहलोत बेंगळुरूमध्ये नसल्याने राजकीय प्रक्रिया रखडली आहे.

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात म्हणजेच कर्नाटकात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील, परंतु राज्यपाल हेच ऑऊट ऑफ टाऊन असल्यानं राजीनाम्याचा विषय रखडला आहे. (siddaramaiah May Quit, But Governor’s Unavailability Delays Power Shift)

दरम्यान सिद्धरामय्या आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात अशी अटकळ आहे. मात्र, त्यांनी अद्याप तसे अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीये. दरम्यान, राज्यपाल थावरचंद गेहलोत राजधानी बेंगळूरूमध्ये नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सिद्धरामय्या आणि राज्यपाल यांची भेट होण्याची शक्यता वाटत नाहीये. दरम्यान सिद्धरामय्या यांनी राजीनामा दिल्यानंतर डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. मात्र, काँग्रेस पक्षाने अद्याप याची घोषणा केलेली नाही.

राज्यपाल गेले कुठे?

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गेहलोत सध्या बंगळूरुमध्ये नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपाल बुधवारी रात्री ११:३० वाजता मुंबईसाठी रवाना झाले. यामागे कौटुंबिक कारणासाठी ते मुंबईला गेल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्यांनी आपल्या प्रवासाचे कारण सार्वजनिकरित्या उघड केलेले नाही. असे म्हटले जात आहे की, त्यांच्या परतीच्या विमानाचे तिकीट अद्याप बुक झालेले नाही.

राज्यपाल नाहीत, मग पुढे काय होणार?

सूत्रांचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, सिद्धरामय्या राज्यपालांच्या कार्यालयात आपला राजीनामा सादर करणार आहेत. यापूर्वीच्या अटकळांनुसार, सिद्धरामय्या सकाळी ११ वाजता आपला राजीनामा सादर करून राज्यपालांना भेटतील असं म्हटले जात होते. विशेष म्हणजे, त्यांनी गुरुवारी आमदारांची बैठक बोलावली आहे. राजकीय तर्कांमध्ये अंतर्गत समन्वय मजबूत करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिले जातंय. या घडामोडीला आणखी गती देत, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिल्लीतील आपला मुक्काम वाढवला आहे. ते आता गुरुवारी सकाळी बेंगळूरुला परतणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील येरवडा जेलमध्ये कायद्यांची तुफान हाणामारी

Mumbai : रोटीवरच थुंकला कुक, मुंबईतील नामंकित हॉटेलमधील धक्कादायक घटना, Video व्हायरल

konkan : दाट जंगलात हरवलेला सागरी किल्ला, कोकणातील 'हे' रहस्यमय ऐतिहासिक ठिकाण पाहिलात का?

Ladki Bahin Yojana : ४ दिवसांत मे महिना संपणार, 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

Deepali Sayyad : प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांना धमकीचे फोन; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT