Smriti Irani on Priyanka Gandhi Saam Tv
देश विदेश

Smriti Irani on Priyanka Gandhi : 'प्रियांका गांधींना मी रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिलं', स्मृती इराणींच्या वक्तव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Smriti Irani VIdeo: 'प्रियांका गांधींना मी रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिलं', स्मृती इराणींच्या वक्तव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Smriti Irani on Priyanka Gandhi : 'प्रियांका गांधींना मी रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिलं', असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच काँग्रेस आणि भाजप आपली संपूर्ण ताकद लावून प्रचार करत आहेत. यातच राज्यात उत्तर भारतीयांचे मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही पक्षातील उत्तर भारतात आपली पकड असलेले नेते प्रचारासाठी उतरले आहेत. याच दरम्यान 'एएनआय' या वृत्त संस्थेशी बोलताना स्मृती इराणी असं म्हणाल्या आहेत.

Smriti Irani on Priyanka Gandhi : काय म्हणाल्या स्मृती इराणी?

स्मृती इराणी म्हणाल्या की, मला शिवकुमारजींना सांगायचे आहे की ते मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यामुळे त्यांनी मंदिराचे वचन न दिलेलेच बरे. (Latest Marathi News)

इराणी म्हणाल्या की, माझा त्यांना प्रश्न आहे की, असे वाक्य बोलण्यापूर्वी त्यांनी श्रीमती वड्रा यांचा विचारणा केली का? मी हे म्हणत आहे, कारण २०१९ मध्ये मी श्रीमती वाड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांना रस्त्यावर नमाज अदा करताना पाहिले होते. इस्लाम धर्म मानणारे मूर्तीचे पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.

Karnataka Election 2023 : 'कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन होणार'

कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे इराणी म्हणाल्या आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता टाकून प्रत्येक धर्माच्या आणि प्रत्येक वर्गातील महिलांना सक्षम बनवण्याची आपली वचनबद्धता बळकट केली आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT