Bhagavad Gita Saam Tv
देश विदेश

Bhagavad Gita: ‘तज्ज्ञांनी सांगितल्यास…’; भगवद् गीता अभ्यासक्रमात आणू : शिक्षणमंत्री

मुलांवर ज्या गाेष्टींचा प्रभाव पडेल, ज्याचा परिचय होईल त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल.

साम न्यूज नेटवर्क

कर्नाटक : गुजरात (Gujarat) पाठाेपाठ कर्नाटक (Karnataka) सरकारने शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद् गीता (Bhagavad Gita) या समावेश करण्याची तयारी केली आहे. तज्ञांनी मान्यता दिल्यास गीतेचा अभ्यासक्रमात (Bhagavad Gita in school syllabus) निश्चित समावेश केला जाईल असे कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश (Karnataka education minister BC Nagesh) यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बाेलताना नमूद केले.

ते म्हणाले भगवद् गीता केवळ हिंदूंसाठी (hindu) नाही, ती सर्वांसाठी आहे. तज्ज्ञांनी सांगितले तर नक्कीच त्याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल. दरम्यान यंदाच्या वर्षात नव्हे तर पुढील वर्षापासून निश्चित केले जाईल असेही शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बाेलताना नमूद केले.

नैतिक शास्त्र (Moral Science) 'वर्षानुवर्षे सोडले जात आहे' असेही नागेश यांनी नमूद केले. ते म्हणाले, "आम्ही शाळांमध्ये नैतिक शास्त्राचा अभ्यास केला आहे. आता त्याची ओळख करून द्यावी, असे पालकांना वाटते. सध्या, आम्ही याबद्दल विचार केला नाही, परंतु आम्हाला भविष्यात ते आणायचे आहे. नैतिक शास्त्रातील विषय तज्ञांकडून ठरवले जातील असे मंत्री नागेश यांनी स्पष्ट केले.

आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यावर शिक्कामाेर्तब करु. मुलांवर ज्या गाेष्टींचा प्रभाव पडेल, ज्याचा परिचय होईल, मग ती गीता असो, रामायण असो किंवा महाभारत असो. पुढं बाेलताना मंत्री नागेश म्हणाले

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT