Skeletal of 5 Family Members Saam TV
देश विदेश

Skeletal of 5 Family Members: एकाच घरात सापडले ५ मानवी सांगाडे; धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ

Karnataka News: सांगाडे सापडलेल्या घराशेजारी असलेल्या परिसरात अनेक व्यक्ती सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत होत्या. २ महिन्यांपूर्वी या घराचा मुख्य लाकडी दरवाजा तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

Ruchika Jadhav

5 Family Members Skeletal:

कर्नाटकमधून एक खळबळजनक घटना समोर आलीये. चित्रदुर्ग परिसरातील एका घरात ५ मानवी हाडांचे सांगाडे सापडले आहेत. सर्व सांगाडे एकाच कुटुंबातील सदस्यांचे असल्याची माहिती मिळालीये. सदर घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, घरामध्ये एकूण ५ सांगाडे सापडले आहेत. यातील २ बेडवर आणि २ सांगाडे जमिनीवर आहेत. तर दुसऱ्या खोलीत आणखी १ सांगाडा आहे. सांगाडे सापडलेल्या घराशेजारी असलेल्या परिसरात अनेक व्यक्ती सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत होत्या. २ महिन्यांपूर्वी या घराचा मुख्य लाकडी दरवाजा तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

काही दिवसांनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेतली. पोलीस घराचे दार खोलून आतमध्ये गेले तेव्हा येथे एकूण ५ मानवी सांगाडे सापडले.पोलिसांनी हे सांगाडे ताब्यात घेतले असून देवेंगेरे येथून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले आहेत.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांना या मृतदेहांची ओळख पटवली आहे. प्राथमिक तपासानुसार हे सांगाडे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे आहेत. यामध्ये जगन्नाथ रेड्डी (वय ८५ वर्षे) त्यांची पत्नी प्रेमा रेड्डी (वय ८० वर्षे), मुलगी त्रिवेणी रेड्डी (वय ६२ वर्षे), थोरला मुलगा कृष्णा रेड्डी (वय ६० वर्षे) आणि धाटका मुलगा नरेंद्र रेड्डी (वय ५७ वर्षे) यांचे आहेत.

सध्या हे मानवी सांगाडे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. मिळालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार मृतांची अचूक ओळख निश्चित होईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Upma Recipe : नाश्त्याला काही हलके-फुलके खावंसं वाटतंय? मग झटपट बनवा ब्रेड उपमा

Nandurbar: नंदुरबारमध्ये यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, पाळण्याची कडी तुटल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

अजितदादांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळाला, पुरावा नष्ट? अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

Ajit Pawar Plane Crash Case: पायलट कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले? त्याचा CCTV पुरावा द्या; मिटकरींची मागणी

SCROLL FOR NEXT