Karnataka Result 2023 saam tv
देश विदेश

Karnataka Election Result 2023: भाजपला मोठा धक्का! पहिल्या अर्ध्या तासात कॉंग्रेस १०० जागांनी आघाडीवर

Karnataka VidhanSabha Election Result : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला सध्या सुरूवात झाली आहे.

Gangappa Pujari

Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला सध्या सुरूवात झाली आहे. निवडणूकीत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे. तसेच नेहमीप्रमाणे JDS यावेळीही किंगमेकर ठरणार का याकडे लक्ष लागलेले असतानाच कुमार स्वामी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालापूर्वी (Karanataka Election) जेडीएसने युतीबाब त मोठे वक्तव्य केले आहे. आमच्या अटी मान्य करणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत आम्ही युती करण्यास तयार आहोत, असे धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी सांगितले आहे.

तसेच एक्झिट पोलनुसार माझी कोणतीही भूमिका असणार नाही. त्यासाठी पुढील 2 ते 3 तास प्रतीक्षा करावी लागणार आहे. माझी कोणतीही मागणी नाही, माझा पक्ष छोटा आहे, मी कोणतीही मागणी कशी करू शकतो, असेही ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

निकालाबाबत बोलताना कुमार स्वामी यांनी धजदला (JDS) ५० जागा मिळतील. धजद फार कमी जागांवर जिंकेल, असा अंदाज अनेक सर्वेक्षणांनी वर्तवला आहे; मात्र आमच्या पक्षाला ५० जागा मिळतीलच, असा दावाही केला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या राजकारणात JDS अनेकदा किंगमेकरची भूमिका बजावताना दिसली आहे.

पहिली अपडेट...

दरम्यान, मतमोजणीला सुरूवात होऊन अवघा अर्धा तास झाला असताना कॉँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. पहिल्या कलानुसार काँग्रेसने १०० जागांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजप ८० जागांवर आघाडीवर आहे...(निकाल अपडेट होत आहेत..)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT