Kanpur Crime News Saam tv
देश विदेश

Kanpur Crime News: संध्याकाळी मित्रांसोबत केक कापला, सकाळी सापडला मृतदेह; विद्यार्थ्यासोबत वाढदिवसाच्या पार्टीत घडली भयंकर घटना

kanpur crime news in Marathi: कानपूरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. कानपूरच्या डेन्टल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

Kanpur Crime News:

कानपूरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. कानपूरच्या डेन्टल कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्याचा मृतदेह वसतीगृहात आढळल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. विद्यार्थ्याचा वडिलांनी त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याचा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, कानपूरमधील बिठूर पोलीस स्टेशनच्या रामा डेन्टल कॉलेजमध्ये ही घटना घडली. रविवारी हॉस्टेलच्या एका रुममध्ये या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. साहित सारस्वत असं या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

२४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण कॉलेजमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या विद्यार्थ्याचा मृतदेह हा शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विद्यार्थ्याच्या वडिलांनी काय आरोप केला?

विद्यार्थ्याच्या वडिलांचा आरोप आहे की, साहिलच्या डोक्याला दुखापतीच्या खुणा आढळल्या आहेत. मृतदेहावरही कापले गेल्याच्या खुणा आहेत. आपपासातील वादामुळे साहिलची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. तसेच त्याच्या वडिलांनी पोलिसांनी व्यवस्थित तपास न केल्याचा आरोप केला आहे.

मृत विद्यार्थ्याचे वडील मथुरा येथे शाळेची बस चालवतात. साहिल हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत अर्ज दाखल केला आहे. साहिलच्या मृत्यूने साहिलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वाढदिवासाच्या पार्टीत घडली भयंकर घटना

रविवारी सकाळी साहिलचा मृतदेह आढळला. साहिलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. पोलिसांनी साहिलचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. साहिलचा वाढदिवस २४ तारखेला होता. त्याच्या वाढदिवसाची पार्टी त्याने मित्रांना दिली होती. मात्र, पार्टीच्या दुसऱ्या दिवशीच त्याच्या मृत्यूची वार्ता समोर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

SCROLL FOR NEXT