kangaroo Viral Video: या जगात दररोज अशा अनेक विचित्र घटना घडतात ज्याचा आपण विचार देखील करत नाही. कधी कधी आपल्याला असे काही पाहायला मिळते ज्यावर आपल्यला विश्वास ठेवणे कठीण जाते. यातील काही घटनांचे व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
हल्ली सोशल मीडियावर अशा मनाला भिडणाऱ्या व्हिडिओंची संख्या झपाट्याने वाढत आहे. यातील बहुतेक व्हिडिओ खरे आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सामान्य लोकांनी अपलोड देखील केले आहे. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कांगारू मैत्रीचे अनोखे उदाहरण मांडताना दिसत आहे.
अजगर आणि कांगारूची लढत
हा व्हिडिओ एक अजगर आणि कांगारूंचा आहे. यामध्ये अजगर कांगारूचा शिकार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्याचवेळी देवदुतासारखा एक कांगारू येतो आणि अजगराला बाजू करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
कांगारू सतत आपल्या मित्राचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. कधी तो अजगराच्या तोंडाला तर कधी त्याच्या शरीराला चावण्याचा प्रयत्न करतो.मात्र दुर्देवाने अजगराच्या तावडीत सापडलेल्या त्या कांगारूंला वाचवण्यात अपयशी ठरतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कांगारू मैत्रीचे अनोखे उदाहरण मांडताना दिसत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ वाइल्डलाइफ अॅनिमल्सने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. याला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. मित्राला वाचवण्यासाठी कांगारूंनी उचललेले हे पाऊल सर्वांनाच चकित करत आहे. मैत्रीचे उदाहरण घालून देणारा हा कांगारू युजर्समध्ये चांगलाच प्रसिद्ध होत आहे. ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.