Kangana Ranaut vs Rahul Gandhi :  Saam tv
देश विदेश

Kangana Ranaut : राहुल गांधींना स्वत:च्या जातीविषयी माहिती नाही; कंगना रणौत यांनी पोस्ट करत साधला निशाणा

Kangana Ranaut vs Rahul Gandhi : कंगना रणौत यांनी पोस्ट करत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधींना स्वत:च्या जातीविषयी माहिती नाही, असं म्हणत कंगना रणौत यांनी टोला लगावला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या लोकसभेतील जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून कंगना रणौत यांनी निशाणा साधला आहे. कंगना रणौत यांची राहुल गांधी यांच्या टीकेवरील पोस्ट व्हायरल होत आहे. अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत अपमान केल्याचा आरोप राहुल गांधी केला होता. त्यानंतर कंगान यांनी जुन्या व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींवर टीका केली आहे.

खासदार कंगना रणौत यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना जाती-पातीविषयी माहिती नाही. असं वाटतंय की पास्त्याला कडीपत्त्याची फोडणी दिली आहे'.

कंगना रणौत यांनी राजकारणात एन्ट्री केल्यानंतर समोर येऊन राजकीय भाष्य करत आहे. कंगना रणौत यांनी म्हटलं की, 'त्यांना जातीविषयी माहिती नाही. 'नानू' मुस्लिम, 'दादी' पारशी, आई ख्रिश्चन आहे. तर स्वत: तर ते पास्त्याला कडीपत्त्याची फोडणी देऊन खिचडी बनवण्याचा प्रयत्न झाल्यासारखं आहे. यांना सर्वांच्या जातीची माहिती करून घ्यायची आहे'. ते जातीविषयी कसं काय विचारू शकतात? राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे, अशी टीका कंगना यांनी केली आहे.

कंगना रणौत यांनी विरोधी पक्षाला दोन चेहरे असल्याची टीका केली आहे. एका व्हिडिओमध्ये राहुल गांधी बोलताना दलित आणि ओबीसी बांधवाविषयी बोलत आहेत. हा व्हिडिओ ऑक्टोबर २०२३ सालचा आहे. तर दुसरा व्हिडिओ फेब्रुवारी २०२४ सालचा आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका रॅलीत जातीविषयी बोलत आहेत. त्यात अखिलेश यादव यांचाही व्हिडिओ आहे. त्यात ते जात विचारल्याने टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मंगळवारी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला. केंद्रीय अर्थसंकल्पादरम्यान ठाकूर यांनी शिवीगाळ आणि अपमान केल्याचा आरोप राहुल गांधींचा आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटलं होतं की, ज्यांना स्वत:च्या जातीविषयी माहिती नाही. ते जातनिहाय जनगणनेविषयी बोलत आहेत'. टीकेनंतर अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, 'मी फक्त ज्यांना जातीविषयी माहीत नाही. ते जातनिहाय जनगणनेविषयी बोलताहेत. मी या वाक्यात कोणाचंही नाव घेतलं नव्हतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने मजुरांना चिरडलं; ६ महिलांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: डोंबिवली एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा ठप्प

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT