Justin Trudeau On India Saam tv
देश विदेश

Justin Trudeau On India: कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो पुन्हा बरळले; अमेरिकेचा उल्लेख करत भारताविरोधात केले वक्तव्य

Canada pm Justin Trudeau : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताविरोधात पुन्हा मोठं वक्तव्य केलं आहे. खलिस्तानी गुरपवंत सिंह पन्नू याच्या कथित हत्येच्या षडयंत्रावरून पंतप्रधान ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले आहेत.

Vishal Gangurde

Justin Trudeau Latest News:

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताविरोधात पुन्हा मोठं वक्तव्य केलं आहे. खलिस्तानी गुरपवंत सिंह पन्नू याच्या कथित हत्येच्या षडयंत्रावरून पंतप्रधान ट्रूडो यांनी भारतावर आरोप केले आहेत. गुरपवंत सिंह पन्नू कथित हत्येच्या षडयंत्र प्रकरणात अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर भारताचे सूर बदलले, असं वक्तव्य कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी म्हटलं की, अमेरिकेने पन्नू यांची कथित हत्येच्या षडयंत्रात भारतीय नागरिकाचा हात असल्यावरून भारताला इशारा दिला आहे. भारताला कळालं आहे की, त्यांना नेहमी आक्रमक राहता येणार नाही. यामुळे भारतामध्ये सहकार्य करण्याची भावना निर्माण झाली आहे. मात्र, याआधी तसं काही नव्हतं'.

भारत आणि कॅनडात दुरावा

ट्रूडो यांनी अधोरेखित केलं की, कॅनडा सध्या भारताच्या विरोधात जाऊ इच्छित नाही. फक्त त्यांना त्यांच्या लोकांच्या सुरक्षेवर भर द्यायचा आहे. 'आम्हाला भारतासोबत व्यापाराचा करार करायचा आहे. तसेच इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी पुढे जाताना पाहायची आहे. मात्र, आम्हाला कॅनडाच्या लोकांच्या अधिकारांचं रक्षणही करायचं आहे. आता फक्त कायद्याच्या अखत्यारित काम करायचं आहे, असंही ट्रूडो म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पन्नू याच्यावरून अमेरिकेवर काय आरोप केले?

कॅनडाच्या पंतप्रधान ट्रूडो यांच्या वक्तव्यानुसार, अमेरिकेने गेल्या महिन्यात दावा केला होता की, भारताने गुरपतवंत सिंह पन्नूच्या कथित हत्येचं षडयंत्र रचलं. पन्नू हा अमेरिकेचा नागरिक आहे. भारत सरकारने त्याला दहशतवादी घोषित केलं आहे. पन्नूच्या विरोधात भारतात डझनभर गुन्हे दाखल आहेत.

अमेरिकेच्या न्याय विभागाचं म्हणणं काय?

अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटलं की, 'पन्नू प्रकरणी न्यूयॉर्क कोर्टात खटला दाखल आहे. या खटल्यात निखिल गुप्ता नावाच्या भारतीय नागरिक आणि एका अज्ञात भारतातील सरकारी अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येचं षडयंत्र आखल्याचा आरोप आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT