Johnson And Johnson Saam Tv
देश विदेश

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी बेबी पावडर का बंद करणार आहे?

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी आपल्या बेबी टॅल्कम पावडरची विक्री बंद करणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson And Johnson) कंपनी आपल्या बेबी टॅल्कम पावडरची विक्री बंद करणार आहे. पुढील वर्षापासून म्हणजेच २०२३ पासून कंपनी जगभरात बेबी टॅल्कम पावडर विकणार नाही. कंपनीने आधीच अमेरिका आणि कॅनडामध्ये टॅल्कम पावडरची विक्री बंद केली आहे. आता जॉन्सन अँड जॉन्सन कॉर्नस्टार्चवर आधारित पावडर बाजारात आणणार आहे.

गेल्या काही दिवसापासून जॉन्स अँड जॉन्सन (Johnson And Johnson) कंपनीवर आरोप सुरू आहेत. त्यामुळे पावडरची विक्री कमी झाली होती. त्यामुळे आता कंपनीने विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेबी पावडर का बंद होणार?

बेबी टॅल्कम पावडरच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका असल्याचे दावा जगात केले जात आहेत. जॉन्सन अँड जॉन्सननेही (Johnson And Johnson) पावडर सुरक्षित असल्याचा दावा केला असला तरी कर्करोगाच्या धोक्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या विक्रीवर परिणाम झाला आहे, त्यामुळे कंपनीने पावडरची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेबी पावडरपासून कर्करोगाचा धोका

बेबी पावडरमध्ये आता टॅल्कम पावडरऐवजी कॉर्नस्टार्चचा वापर केला जाणार आहे. कंपनीने हा व्यावसायिक निर्णय घेतला आहे. कंपनीवर जगभरात ३८ हजारांहून अधिक खटले सुरू आहेत. अनेक महिलांनी कर्करोगाचा दावा केला आहे. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कर्करोग निर्माण करणारे घटक सापडले आहेत, असा दावा अमेरिकेतील नियामकांनी केला आहे. पण कंपनीने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

कंपनीने गेल्या पाच वर्षांत १ डॉलर अब्जाहून अधिक खटले भरले आहेत. कंपनीला सेटलमेंट प्रकरणे निकाली काढण्यासाठी आतापर्यंत सुमारे ३.५.डॉलर अब्ज द्यावे लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

SCROLL FOR NEXT