Jharkhand Assembly Election Saam Digital
देश विदेश

Jharkhand Assembly Election : जागावाटप ठरलं! काँग्रेस २९ तर झामुमो 43 जागांवर लढणार, RJD ला किती जागा मिळाल्या?

Jharkhand Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षामध्ये जागावाटपचा फॉर्म्यूला ठरलाय. कोणाला किती जागा मिळाल्या?

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Jharkhand Vidhan Sabha Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (Jharkhand Assembly Election) सत्ताधारी पक्षामध्ये जागावाटपचा फॉर्म्यूला ठरलाय. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड मुक्ति मोर्चा (झामुमो) सर्वाधिक जागा लढणार आहे. झामुमोला ४३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस २९ जागांवर मैदानात उथरणार आहे. राष्ट्रीय जनता दल (राजद) पाच तर भाकपा (माले) चार जागांवर निवडणूक लढणार आहे.

झारखंडमधील जागा वाटपावर आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये राजदचे तेजस्वी यादव आणि भाकपाचे (माले) राष्ट्रीय महासचिव दीपांकर भट्टाचार्य सहभागी होणार आहेत. त्याशिवाय काँग्रेसचे गुलाम अहमद वीर, तारिक अनवर यांच्याह काही वरिष्ठ नेतेही बैठकीत सहभागी होणार आहेत. आज सकाळी ११ वाजता बैठक होणार आहे. बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा आणि शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाबाबत सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधारी आघाडीकडून पुन्हा त्याच आमदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा बेत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पहिली उमेदवाराची यादी १९ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी झारखंड दौऱ्यावर

झारखंडचे काँग्रेस प्रभारी गुलाम अहमद मीर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस उमेदवार यादी लवकर जाहीर करण्यात येईल असे सांगितले. त्याशिवाय राहुल गांधी यांच्या झारखंड दौऱ्याबाबतही सूतोवाच दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष केशव महातो कमलेश, विधिमंडळ पक्षनेते डॉ. रामेश्वर ओराव यांची भेट घेऊन राहुल गांधींच्या आगमनाच्या तयारीचा आढावा घेतला. झारखंड दौऱ्यात राहुल गांधी अनेक सामाजिक संस्थांसोबत बैठका घेणार आहेत.

राजदला हव्यात २२ जागा, लाल प्रसाद यादव घेणार अंतिम निर्णय

जागा वाटपाबाबत बैठकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) अधिक जागा मिळावण्यासाठी दबाव तंत्र वापरलेय. गुरुवारी झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत 22 जागांवर दावा करण्यात आलाय. यावर निर्णय घेण्याचा अधिकार लालू प्रसाद यांना देण्यात आला आहे. त्याशिवाय तेजस्वी यादव यांनाही या निर्णयाची माहिती दिली जाणार आहे. जागावाटपात राजदला फक्त ४ जागा ऑफर करण्यात आल्यात. आज जागा वाटपाचा अंतिम निर्णय समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT