Ayodhya Ram Mandir Saam Tv
देश विदेश

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होताच मिळाली गुड न्यूज; आता रामनगरीत वर्षाला होणार इतक्या कोटींची कमाई

Vishal Gangurde

Ayodhya Ram Mandir Pran Pratishta:

अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. देशभरातील लोकांचं या सोहळ्याकडे लक्ष होतं. अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर आता रामनगरीत ८५,००० कोटी रुपयांची कमाई होणार आहे. राम मंदिराचं लोकार्पण झाल्यानंतर चांगली आर्थिक कमाई होणार आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाउस जेफरीजच्या राम मंदिराशी निगडीत एक रिपोर्ट समोर आला आहे. (Latest Marathi News)

५ कोटी पर्यटकांना आकर्षित करणार

जेफरीजच्या रिपोर्टनुसार, राम मंदिराचं लोकार्पण झाल्याने आता आर्थिक भरभराट होणार आहे. मंदिरात श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्याने आता हे मंदिर पाहण्यासाठी ५ कोटी वर्षाला पर्यटकाला हजेरी लावू शकतात. याचा मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.

अयोध्येसाठी अनेक विमानसेवा सुरु झाल्या आहेत. या भागात अनेक कंपन्यांनी प्रोजेक्ट सुरु केले आहेत.

८५००० कोटी रुपये कसे मिळणार?

अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम मंदिरात ५ वर्षांच्या राधव स्वरुपातील रामाची प्राण प्रतिष्ठा २२ जानेवारीला नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या दिवशी जेफरीजने रिपोर्ट शेअर केला आहे.

जेफरीजनुसार, अयोध्यानगरीत राम मंदिराचं लोकार्पण झाल्याने आर्थिक फायदा होणार आहे. यामुळे भारताला मोठं पर्यटन स्थळ मिळालं आहे. या मंदिराला वर्षाला पाच कोटी भाविक आणि पर्यटक भेट देऊ शकतात. 'साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

जेफरीजनुसार, ७० एकरवरील पर्यटन स्थळावर १० लाख भक्त एकत्र भोजन ग्रहण करू शकतात. या मंदिराच्या ठिकाणी दिवसाला १ ते १.५ लाख भाविक भेट देऊ शकतात. त्यामुळे अयोध्येतील व्यावसायिक दिवसाला लाखो रुपये कमावू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane : आमचं सरकार पुन्हा सत्तेत येऊ दे, ऑर्थर रोड तुरुंगातच टाकतो; नितेश राणे कुणावर भडकले?

Accident Video : बापरे! धावत्या कंटेनरचं चाक निघालं अन् ...; पुढे जे घडलं ते भयंकरच; पाहा VIDEO

Pune Crime : पुण्यात महिला सुरक्षित नाहीत का? ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार, पुण्यातील संतप्त घटना

Vastu Tips: घराच्या योग्य कोपऱ्यात ठेवा मनी प्लांट, संपत्तीत होईल वाढ

Prediction Of Death: कधी आणि कसा होणार मृत्यू? डॉक्टरांनी तयार केलं मृत्यूचं अचूक भाकीत करणार टूल

SCROLL FOR NEXT