JEE Mains Result Saam TV
देश विदेश

JEE Mains Result: प्रतीक्षा संपली! जेईई मेन्सचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांनी पटकवले १०० टक्के गुण

Ruchika Jadhav

JEE Main Result:

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी जेईई मेन्सच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रातील ३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत. आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा अशी या तिन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत.

संपूर्ण देशभरामध्ये एकूण २३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुणांवर यश संपादन केलं आहे. देशभरातून या परीक्षेला ११ लाख ७० हजार विद्यार्थ्यां बसले होते. यामध्ये ३ लाख ८१ हजार मुली आहेत. जेईई परीक्षेत दीड लाख विद्यार्थी पात्र ठरतात. या सर्वांना पुढे जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा द्यावी लागते.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (एनटीए) आयआयटीसारख्या केंद्रीय शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई परीक्षा दिली जाते.

जेईई मेन स्कोअरकार्ड

जेईई मेन 2024 स्कोअरकार्ड मिळवण्यासाठी जेईईच्या निकाल पृष्ठावर jeemain.nta.ac.in लींकवर जा. पुढे स्कोअरकार्डमध्ये खालील माहिती भरा.

  • उमेदवाराचे नाव

  • अर्ज क्रमांक आणि रोल नंबर

  • पालक तपशील

  • पात्रता स्थिती

  • राष्ट्रीयत्व

  • श्रेणी (आरक्षित किंवा अनारक्षित)

  • अपंग व्यक्तींवरील तपशील

  • एकूण NTA JEE स्कोअर

JEE Mains मध्ये नापास झाल्यास काय करावे?

जेईई परीक्षा उत्तीर्ण व्हायचं स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र सर्वांचीच स्वप्न पूर्ण होत नाहीत.

परीक्षेत अपयश मिळाल्यावर तुम्ही करीअरसाठी वेगळा पर्याय देखील निवडू शकता.

BITSAT, VITEEE, SRMJEEE इत्यादी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तुम्ही देऊ शकता.

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित किंवा संगणक विज्ञान यासारख्या विज्ञान क्षेत्रात देखील तुम्ही करिअरची तयारी करू शकता.

आवडीच्या क्षेत्रात तुम्ही डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स देखील करू शकता.

सरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेल्या कोर्सची तयारी करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT