JCB Tyre Bursts  Saam Tv
देश विदेश

बापरे! हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला; दोघांचा मृत्यू

छत्तीसगडमधील रायपूर येथील (Raipur) सिलतारा गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: छत्तीसगडमधील रायपूरमधील (Raipur) सिलतारा येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे हवा भरताना जेसीबीचा (JCB) टायर फुटला आहे. या अपघातात (accident) उपस्थित असलेल्या २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राजपाल आणि प्रांजन अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

हे देखील पाहा-

हा स्फोट (Explosion) इतका भीषण होता की, टायरजवळील दोन्ही कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यासोबतच त्यांच्या शरीराचे काही तुकडेही आजूबाजूला विखुरले होते. त्याचवेळी जेसीबीचा टायर फुटल्याने ते दूरवर पडले. या प्रकरणाबाबत सिलतारा चौकीचे प्रभारी राजेश जान पाल यांनी सांगितले की, रामदिन सिंग (वय-३२) आणि राजभान नामदेव (वय- ३२), राहणार खमहरिया, ठाणे कोटोर, जिल्हा सतना हे घनकुन स्टील्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गॅरेजमध्ये काम करत होते.

दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघेही जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत होते. यादरम्यान अचानक टायरचा मोठा आवाज झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT