Jammu Kashmir Assembly Election Result 2024 Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir Election Result : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आघाडीला मोठं यश, सुरुवातीच्या कलामध्ये बहुमत, ४६ पार; भाजपला धक्का

Jammu Kashmir Assembly Election Result 2024:

Priya More

जम्मू -काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सध्या मतमोजणी सुरू असून संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या ९० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजप या ३ पक्षामध्ये जोरदार टक्कर झाली. या तिन्ही पक्षांपैकी कोण बाजी मारते याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत.

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकालाचे सुरूवातीचे कल हाती आले आहेत. १० वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी ४६ भाजप २३, पीडीपी ३ आणि इतर १४ जागांवर आघाडीवर आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेस आघाडीवर असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र सुरुवातीला आलेल्या कलानुसार नॅशनल कॉन्फरन्स आघाडी आणि भाजप आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

जम्मू-काश्मीरमधील सर्व ९० जागांवरचे जे कल आले आहेत आणि काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने आघाडी घेतली आहे. परंतु भाजपला चुरशीची लढत दिली जात आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ४६ जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजप २३ जागांवर आघाडीवर आहे. पीडीपी ३ जागांवर तर इतर १४ जागांवर आघाडीवर आहेत.

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काटेकी टक्कर सुरू असून भाजपने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला मोठी आघाडी मिळवण्यापासून रोखले आहे. पहिल्या अर्ध्या तासांत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स २८ जागांवर आघाडीवर होते आता काँग्रेसची आघाडीवरील जागांमध्ये वाढ होत आहे. तर भाजपचा देखील हळूहळू आकडा वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT