pahalgam terror attack shrinagar to delhi flight ticket rate Saam Tv News
देश विदेश

दहशतवादी हल्ल्यामध्ये विमान कंपन्यांनी लायकी दाखवली, दिल्लीपर्यंतचं १५ हजारांचं तिकीट दर ६५ हजारांवर नेलं

Pahalgam Terror Attack Flight Ticket : आधीच संकटात सापडलेल्या पर्यंटकांसमोर विमान कंपन्यांनी त्यांची लायकी दाखवत आणखी एक संकट उभं केलं. श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात चौपट ते पाचपट वाढ करत फायदा कमावण्याचा प्रयत्न केला आहे.

Prashant Patil

नवी दिल्ली : एकीकडे जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यंटकांनी आपला जीव गमावला असून देश दुःखात बुडाला आहे. त्याचवेळी दुसरीकडे देशातील विमान कंपन्यांनी या हल्ल्यामध्ये लालचीपणाची संधी शोधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे. श्रीनगर ते नवी दिल्ली या मार्गावरील नेहमीचं विमान तिकीट हे १२ ते १५ हजार इतकं असतं. मात्र हल्ल्यानंतर पर्यटकांची वाढती संख्खा पाहता विमान कंपन्यांनी तिकीट दर तब्बल ६५ हजारांपर्यंत नेऊन ठेवलं आहे. यावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

आधीच संकटात सापडलेल्या पर्यंटकांसमोर विमान कंपन्यांनी त्यांची लायकी दाखवत आणखी एक संकट उभं केलं. श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात चौपट ते पाचपट वाढ करत फायदा कमावण्याचा प्रयत्न केला आहे. पहलगाममध्ये २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर ते दिल्ली आणि इतर शहरांच्या विमान तिकिटांच्या किमतीत अचानक वाढ झाली होती. २६ पर्यटकांचा बळी घेणाऱ्या हल्ल्यानंतर, संकटातून बाहेर पडण्यासाठी गर्दी झाली होती. त्याचा फायदा घेऊन विमान कंपन्यांनी तिकीट दरात अनेक पट वाढ केली होती.

हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, श्रीनगर ते दिल्ली एक मार्गी विमान तिकिटाची किंमत ६५,००० रुपयांपर्यंत गेली होती. सामान्य दिवसांमध्ये त्याच तिकिटांची किंमत ही १२,००० ते १५,००० रुपयांदरम्यान होती. उदाहरणार्थ, स्पाईसजेटचे २४ एप्रिलचे विमानाचे भाडे २८,८०० रुपये होते. तर त्याच विमानाचे दर हे इतर दिवशी १४,६०० रुपये आहे. इंडिगो फ्लाइटचे दरही पुन्हा १५,०० रुपयांवर आणण्यात आले आहेत.

अचानक झालेल्या या तिकीच दर वाढीमुळे सोशल मीडियावर लोक संतापले. बऱ्याच युजर्सने एअरलाइन्सवर 'देश संकटात असताना नफा कमावण्याचा' आरोप केला. एका यूजरने लिहिलं की, 'श्रीनगर-दिल्ली फ्लाइटचे भाडे नेहमीपेक्षा ४ ते ६ पटीने जास्त आहे. हा संकटाचा काळ आहे आणि अशा परिस्थितीत खासगी क्षेत्रात खुलेआम लूट सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT