जम्मूच्या ग्रेटर कैलाश परिसरात फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार.
अज्ञात हल्लेखोराकडून गोळीबार केल्याची माहिती.
माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झाला आहे. जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात ही गोळीबाराची घटना घडली. एका अज्ञात हल्लेखोराने माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार केला.
वृत्तानुसार, डॉ. फारुख अब्दुल्ला या गोळीबारातून थोडक्यात बचावलेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाहीये. मात्र या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. त्यांनी परिसराला घेराव घातला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत गोळीबार करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे.
फारूख अब्दुल्ला हे ग्रेटर कैलाश येथे एका वकीलाच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला, दरम्यान आरोपीने हा हल्ला कोणत्या कारणामुळे केला याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. दरम्यान जम्मू-काश्मीर पोलीस या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. आरोपीचे नाव कमल सिंग जामवाल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी गोळीबाराच्या घटनेला सुरक्षेतील चूक म्हटले. ते म्हणाले, "आम्ही सर्वजण एकत्र आहोत. मी, आमचे नेते फारुख अब्दुल्ला आणि नासिर एकत्र होतो." दरम्यान जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी फारुखसोबत होते तेव्हा त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.
गोळीबाराची घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी म्हणाले की, हे सुरक्षेतील चुकीमुळे घडलंय. "आम्ही सर्वजण एकत्र आहोत. मी, आमचे नेते फारुख अब्दुल्ला आणि नासिर एकत्र होतो." सर्वजण सुरक्षित आहेत. अशी चूक कशी घडली याबद्दल पोलिसांना विचारालं पाहिजेत. ही घटना ग्रेटर कैलाशमधील रॉयल पार्कमध्ये घडली. तेथे स्थानिक पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हते. ही एक गंभीर सुरक्षेची चूक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.