Jammu Kashmir Saam TV
देश विदेश

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांत चकमक; सीआरपीएफ गावात जाताच गोळीबार

Firefight Between Army and Terrorists: मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील हदिगाम भागात ही चकमक अद्यापही सुरु आहे. अदिगाम गाव येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला सूत्रांकडून मिळाली होती.

Ruchika Jadhav

Jammu Kashmir News:

जम्मू-काश्मीरमधून (Jammu Kashmir) एक मोठी बातमी समोर आलीये. गुरुवार (४ जानेवारी) रोजी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झालाय. हा गोळीबार सलग २ दिवसांपासून सुरु आहे. दहशतवाद्यांचा शोध घेत असताना गावात प्रवेश करताच लष्करावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर लष्कर आणि दहशतवादी यांच्यातील ही चकमक अजून सुरूच आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील हदिगाम भागात ही चकमक अद्यापही सुरु आहे. अदिगाम गाव येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला सूत्रांकडून मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफ आणि लष्कराच्या संयुक्त मोहिमेत काल गावाला घेराव घालण्यात आला. यावेळी दहशतवादी आणि लष्करात मोठी चकमच झाली.

लष्कर आधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिम सुरू असताना लष्कर पथक गावात दाखल होताच दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांसह सीआरपीएफ देखील घटनास्थळी उपस्थित होते. आजही दहशतवादी आणि लष्करातली चकमक सुरुच आहे.

मंगळवारीच गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्व डाव हाणून पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अनंतनाग चकमकीत सुरक्षा दलाला यश; एक दहशतवादी ठार

२४ डिसेंबर २०२३ रोजी जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात पहाटे चकमक सुरू झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. याबद्दल काश्मीर झोन पोलिसांनी ट्वीट करत माहिती दिली होती.

सध्या कुलगाम येथील अदिगाम गावात सुरु असलेल्या चकमकीत किती दहशतवादी ठार झाले आहेत याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT