Shocking Crime in Pahalgam News Saam tv news
देश विदेश

Pahalgam: महाराष्ट्रातील वृद्ध महिलेवर पहलगाममध्ये अत्याचार; हॉटेलमध्ये ब्लँकेटनं बांधलं अन् अब्रूचे लचके तोडले

70 year old woman tourist assaulted in Pahalgam: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये महाराष्ट्रातील वृद्ध महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. ७० वर्षीय वृद्धमहिलेवर पहलगाममधील आरोपीनं लैंगिक अत्याचार केला. सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे.

Bhagyashree Kamble

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये महाराष्ट्रातील वृद्ध महिलेसोबत संतापजनक प्रकार घडला. पहलगाममधील आरोपीनं पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी आधी वृद्ध महिलेच्या खोलीत गेला. नंतर तिला ब्लँकेटनं बांधलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी पीडित वृद्ध महिलेनं आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायालयात गेलं. न्यायालयाने आरोपीचे जामीन नाकारले असून, पुढील तपास सुरू आहे.

नेमकं घडलं काय?

११ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये ७० वर्षीय महिला फिरायला गेली होती. पीडित महिला महाराष्ट्रातील रहिवाली असल्याची माहिती आहे. वृद्ध महिला एका हॉटेलमध्ये थांबली होती. आरोपी झुबैर अहमद महिलेच्या खोलीमध्ये गेला. महिलेला ब्लँकेटनं बांधलं आणि बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली.

महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. ३० जून रोजी या केस संदर्भात अनंतनाग जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. या घटनेसंदर्भात आरोपीच्या अर्जावर जेव्हा सुनावणी झाली, तेव्हा त्याने आरोप फेटाळले. परंतु, न्यायालयाने जामीन नाकारला. 'महिलेला अतिशय धक्कादायक वागणूक देण्यात आली. या घटनेतील मानसिकता अत्यंत विकृत आहे', असं न्यायालयाने ठामपणे निदर्शनास आणून दिले.

आरोपीने न्यायालयात दावा केला की, पोलिसांकडून खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच आरोपी म्हणून, वृद्ध महिलेनं मला ओळखले देखील नाही, असा दावा आरोपीने केला. दरम्यान, 'आतापर्यंत मी पोलिसांना सहकार्य केलं आहे. यापुढेही करेन', असं आरोपी म्हणाला. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT