Jammu-Kashmir: सुरक्षा दलासोबत चकमक; एका दहशतवादी ठार Saam Tv
देश विदेश

Jammu-Kashmir: सुरक्षा दलासोबत चकमक; एका दहशतवादी ठार

जम्मू -काश्मीरच्या बडगाममधील मोचवा परिसरात आज सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमक झाली आहे.

साम वृत्तसंथा

श्रीनगर: जम्मू -काश्मीरच्या Jammu Kashmir बडगाममधील Badgam मोचवा Mochawa परिसरात आज सकाळी भारतीय सुरक्षा दल Indian security force आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमक झाली आहे. या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले आहे. यावेळी सैन्याने दहशतवाद्यांकडून (AK- 47) रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना काश्मीर झोन पोलिसांनी माहिती दिली की, 'आतंकवादी लपून बसलेल्या ठिकाणी संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. एका दहशतवाद्याला ठार Security forces killed one terrorist in the encounter करण्यात आले आहे. अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

हे देखील पहा-

भारतीय सुरक्षा दलांना जम्मू काश्मीरमधील Jammu Kashmir बडगामच्या मोचवा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे, भारतीय सुरक्षा दलांने स्थानिक पोलिसांची मदत घेऊन एक टीम तयार केली होती आणि या टीमने त्या संपूर्ण परिसराला घेराव घातला होता. यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले पण सर्वबाजूने घेरलेले पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यामुळे प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा दलांनाही गोळीबार केला.

भारतीय सुरक्षा रक्षकांनी दहशदवाद्यांना वारंवार आवाहन करूनही शस्त्र खाली ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर सुरक्षा दलाने सुमारे अर्ध्या तासात दहशतवाद्याला ठार मारले. बराच वेळ गोळीबार न झाल्याने सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी चकमकीच्या ठिकाणी एका दहशतवाद्याचा मृतदेह सुरक्षा दलाला पडलेला दिसून आला. भारतीय पोलिसांनी तो मृतदेह आणि शस्त्रे ताब्यात घेतली. शोध मोहीम Search Operation राबवल्यानंतर इतर कोणतेही दहशतवादी आजूबाजूला नसल्याची खात्री झाली आणि सुरक्षा कर्मचारी परत आले.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT