baramulla Encounter: बारामुल्लात मोठी कारवाई; जिगरबाज जवानांनी ५ दहशतवाद्यांना टिपलं (संग्रहित छायाचित्र)  Saam Tv
देश विदेश

baramulla Encounter: बारामुल्लात चकमक; जिगरबाज जवानांनी ५ दहशतवाद्यांना टिपलं

baramulla Encounter Latest News : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला.

ब्युरो रिपोर्ट, सामटीव्ही

jammu kashmir baramulla encounter श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यातील दोन लश्कर-ए-तोयबाचे दहशतवादी (Terrorist) असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यात 'लश्कर'चा कमांडर युसूफ कांतरू याचाही समावेश आहे.

तत्पूर्वी, बारामुला चकमकीत 'लश्कर'चा टॉप कमांडर युसूफ कांतरू मारला गेला आहे, असे सांगण्यात आले. तो अलीकडेच बडगाम जिल्ह्यात जम्मू-काश्मीर पोलीस विभागातील एसपीओ आणि त्यांचा भाऊ, एक जवान आणि एका नागरिकाच्या हत्येसह इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात सामील होता, अशीही माहिती समोर आली होती.

याआधी जम्मू- काश्मीर पोलिसांनी ट्विट करून चकमकीबाबत माहिती दिली होती. ही चकमक मालवा परिसरात सुरू होती. या चकमकीत सुरुवातीला तीन जवान जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT