Jammu & Kashmir News
Jammu & Kashmir News Saam tv
देश विदेश

Jammu & Kashmir News: दु:खद! जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ रुग्णवाहिका दरीत पडली; २ जवान शहीद

Vishal Gangurde

jammu & kashmir News: जम्मू-काश्मीरमधून एक दुर्दैुवी घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या भारतीय सैन्य दलाचे जवान शहीद झाल्याचे दुर्दैवी वृत्त हाती आलं आहे. काही दिवसांपूर्वी पुंछमध्ये दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर आज राजौरीत २ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. राजौरीजवळ रुग्णवाहिका दरीत पडल्यानंतर झालेल्या अपघातात २ जवान शहीद झाले आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये जवान शहीद होण्याच्या घटना सुरूच आहे. राजौरीजवळील दरीत रुग्णवाहिका पडल्याने दोन जवान शहीद झाले आहेत. या दुर्घटनेत एक जवान हा राजौरीचा तर एक जवान बिहारचा (Bihar) होता.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांची रुग्णवाहिकेचा नियंत्रण रेषेखाली डुंगी गाला सेक्टरजवळ अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेचा चालक आणि एक जवान शहीद झाला. सिक्किममध्ये देखील या सारखीच दुर्दैवी घटना घडली होती. त्या घटनेत १६ जवानांचा मृत्यू झाला होता.

२० एप्रिलला ५ जवान शहीद

दरम्यान, गुरवारी २० एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरच्या भीमबेर गल्ली आणि पुंछच्या दरम्यान एका वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

राष्ट्रीय रायफल्सचे ५ जवान शहीद झाले होते तर १ जवान गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी पीपल्स एंटी फॅसिस्ट फ्रंट नावाच्या संघटनेने घेतली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantigiri Maharaj यांना शिंदे गटाकडून उमेदवारी?

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी दिग्गज खेळाडूकडून टीम इंडियाची घोषणा; या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

Honeymoon Destination : उन्हाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

Today's Marathi News Live : पीएम मोदींनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात होणार जाहीर सभा

Vastu Tips: कारमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

SCROLL FOR NEXT