Jaipur Youth Brutally killed 14 Stab Saam Tv News
देश विदेश

जुना वाद पेटला! भररस्त्यात १४ वेळा चाकूने वार; रक्तरंजित थराराचा व्हिडिओ व्हायरल, त्या रात्री नेमकं काय घडलं?

Killer Posts Video After Stabbing: जयपूरच्या जामडोली भागात २२ वर्षीय विपिन नायक याचा अनस खानने १४ वेळा चाकूने वार करून खून केला. खून केल्यानंतर आरोपीने 'बदला' सांगणारा व्हिडीओही शेअर केला.

Bhagyashree Kamble

जयपूरच्या जामडोली भागात रविवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. २२ वर्षीय तरुण विपिन नायक उर्फ विकी याचा निर्घृण खून करण्यात आला. आरोपी अनस खान उर्फ शूटर याने विपिनवर तब्बल १४ वेळा चाकूने वार केला. खून केल्यानंतर अनसने चाकू दाखवून व्हिडिओ शूट केला. 'आज बदला पूर्ण झाला, आता मी शांत झोपेन', असं कॅप्शन देऊन त्यानं हा व्हिडिओ शेअर केला.

घटना कशी घडली?

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास विपिनला त्याच्या घराजवळ अंधारात बोलावण्यात आलं. तो पोहोचताच अनस खान आणि त्याच्या सात साथीदारांनी त्याच्यावर हल्ला चढवला. चाकूने सलग १४ वार करण्यात आले. विपिनचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, अनसने त्यांना चाकू दाखवून धमकावले. नंतर दुचाकीवरून त्यानं पळ काढला.

रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

विपिनला तात्काळ एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालातून विपिनवर क्रूर पद्धतीने वार केल्यामुळे हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपास केला असता, अनस आणि विपिन यांच्यात जुने वाद होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते.

काही दिवसानंतर वाद संपुष्टात आले. मात्र, हा वाद नव्यानं उफाळून आला. अनसने विपिनला कायमचं संपवण्यासाठी कट रचला. दुचाकीवरून येऊन साथ साथीदारांसह त्यानं विपिनला संपवलं. दरम्यान, घटनेच्या २४ तास आधी त्याने चाकू हलवत एक व्हिडिओ शेअर केला होता.

पोलिस बंदोबस्तात वाढ

घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला. डीसीपी तेजस्वी गौतम आणि अतिरिक्त डीसीपी आशाराम चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सध्या पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT