iit baba abhay singh Saam tv
देश विदेश

Viral IIT Baba Detained : आयआयटी बाबा पोलिसांच्या ताब्यात, काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा

iit baba abhay singh : IIT वाले बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. जयपूर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी त्याला जामीन मंजूर झाला.

Vishal Gangurde

IIT Baba Detained : महाकुंभ मेळ्यादरम्यान चर्चेत आलेला आयआयटी बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. बाबाजवळ गांजा आढळला. त्यानंतर आयआयटी बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. जयपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

रिपोर्टनुसार, नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्सटेन्स (एनडीपीएस) कायद्याअंतर्गत आयआयटी बाबाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. काही वेळानंतर पोलिसांनी आयआयटी बाबाला जामीन मंजूर करण्यात आला.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आयआयटी वाले बाबाकडे गांजाविषयी चौकशी केली. त्यावेळी त्याने प्रसाद असल्याचं सांगितलं. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचेही आयआयटी बाबाने सांगितलं. माझी आत्महत्या आणि अटकेच्या बातम्या खोट्या आहेत. मला अटक करण्यात आलेली नाही. परंतु अमली पदार्थ बाळगल्यासंदर्भात गुन्हा दाखल झालाय. यावेळी त्याने जामीन मंजूर झाल्याचेही सांगितलं.

'मी अघोरी बाबा, गांजाचं सेवन करू शकतो'

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'पोलिसांनी काही तास ताब्यात घेतलं. मात्र, आयआयटी बाबाजवळ गांजाचे प्रमाण कमी होतं. चौकशीदरम्यान आयआयटी बाबाने सांगितलं की, 'मी एक अघोरी बाबा आहे. परंपरेनुसार, आम्ही गांजाचं सेवन करू शकतो'.

दरम्यान, पोलिसांनी सूचना मिळाली होती की, आयआयटी बाबा अभय सिंह जयपूरच्या एका हॉटेलात थांबला होता. मात्र, काही कारणावर वाद झाला. त्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी आयआयटी बाबा अभय सिंहला ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आयआयटी बाबाकडे गांजा आढळला. त्यानंतर पोलिसांनी आयआयटी बाबाला ताब्यात घेतलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Gore: खणाची साडी अन् निखळ हास्य, अपूर्वाचा लूक पाहून चाहते घायाळ

Vastu Tips: घरात धन, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास हवा आहे? अवश्य फॉलो करा 'या' वास्तु टिप्स

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Beed News: धनंजय मुंडेंचं आयुष्य उद्ध्वस्त करून वाल्मिक कराडला मंत्री व्हायचं होतं – बाळा बांगरांचा गंभीर दावा|VIDEO

Mumbai To Kargil : मुंबई ते कारगिल प्रवास कसा करायचा? जाणून घ्या मार्ग, आणि एकूण खर्च

SCROLL FOR NEXT