Technicians Of Chandrayaan-3 Sell Idli Saam Tv
देश विदेश

Chandrayaan-3: चांद्रयान-३ चे टेक्निशिअन विकतायत 'इडली', पत्नीचे दागिने ठेवले गहाण; 18 महिन्यांपासून मिळाला नाही पगार...

Viral News: चांद्रयान-३ चे टेक्निशिअन विकतायत 'इडली', पत्नीचे दागिने ठेवले गहाण; 18 महिन्यांपासून मिळाला नाही पगार...

Satish Kengar

Technicians Of Chandrayaan-3 Sell Idli:

चांद्रयान-३ च्या यशाने भारताचा झेंडा जगभर उंचावला आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ, अनेक अभियंते आणि टेक्निशिअन यांनी रात्रंदिवस मेहनत केली. यामुळेच चांद्रयान-३ यशस्वी होऊ शकले.

पण ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे या मिशनबाबत अनेक अहवालांमधून वेगवेगळे खुलासे केले जात आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, चांद्रयान-३ मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे रांचीचे रहिवासी दीपक कुमार उपरारिया यांना आज रस्त्यावर इडली विकण्याची वेळ आली आहे.

दीपक उपरारिया यांनी सांगितलं की, त्यांना 18 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. ज्यामुळे नाईलाजाने त्यांना हे काम करावं लागलं. इस्रोचे टेक्निशिअन दीपक रांचीच्या धुर्वा भागात जुन्या विधानसभेसमोर इडलीची एक प्लेट 15 रुपयांना विकतात. इस्रोच्या चांद्रयान-3 चा प्रक्षेपण पॅड तयार करण्यात त्यांनी मदत केली होती.  (Latest Marathi News)

बीबीसीच्या वृत्तानुसार, आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या दीपक उपरारिया यांना 18 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन (HEC) रांची येथे आहे, ज्याला चांद्रयान-3 अंतराळयानाचे फोल्डिंग प्लॅटफॉर्म आणि स्लायडिंग डोअर बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दीपक उपरारिया यांनी या प्रकल्पाअंतर्गत चांद्रयान-3 मोहिमेत काम केले होते.

दीपक उपरारिया यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी इडली विकायला सुरुवात केली आहे, पण त्यांनी HECची नोकरी सोडली नाही. आपलं काम सांभाळून ते हे काम करतात. ते सकाळी इडली विकतात आणि मग कामावर जातात. नोकरीवरून परत आल्यानंतरही ते पुन्हा इडली आणि चहा विकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

SCROLL FOR NEXT