Israel Embassy Blast News ANI
देश विदेश

Israel Embassy Blast, Delhi : दिल्ली हादरली, इस्त्राइल दूतावासाजवळ स्फोट, काही अंतरावर सापडलं लेटर

Delhi's Israel Embassy Blast News in Marathi : दिल्लीतील चाणक्यपुरी येथून मोठं वृत्त हाती आलं आहे. नवी दिल्लीच्या इस्त्राइल दुतावासाबाहेर मंगळवारी सायंकाळी स्फोट झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे

Vishal Gangurde

Israel Embassy Blast Update:

दिल्लीतील चाणक्यपुरी येथून मोठं वृत्त हाती आलं आहे. नवी दिल्लीच्या इस्त्राइल दूतावासाबाहेर मंगळवारी सायंकाळी स्फोट झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (Latest Marathi News)

दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना मंगळवारी सांयकाळी ५ वाजून ४७ वाजता एक कॉल आला. त्यानंतर हा कॉल पोलीस नियंत्रण कक्षाला पाठविण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर दिल्ली पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक आणि फॉरेन्सिक पथकांनी इस्राइल दूतावासाबाहेर तपासकार्य सुरु केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'स्फोटके आढळले नाहीत'

'घटनास्थळी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे स्फोटके आढळले नाहीत, अशी माहिती दिल्ली फायर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, इस्राइल दूतावासाबाहेर आतापर्यंत कोणत्यांही प्रकारचे स्फोटके आढळले नाहीत'.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?

'मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याची घटना आहे. मी गेटच्या आत कर्तव्यावर होतो. त्यावेळी एक आवाज आला. मला वाटलं टायर फुटला असेल. मात्र, तिकडे जाऊन बघितलं, तर तिथे काहीच आढळलं नाही. त्यानंतर झाडाजवळ धूर दिसला. आवाजही फार मोठा आला होता, अशी माहिती इस्राइल दूतावासाबाहेरील सेंट्रल हिंदी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे गार्ड तेजू छेत्री यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT