Israel airstrikes Syrian Presidential Palace caught on live TV 
देश विदेश

Israel airstrikes: अ‍ॅकर बातम्या देत असतानाच बॉम्ब हल्ला; इस्रायली हल्ल्याचे दृश्य लाईव्ह कॅमेऱ्यात कैद| VIDEO

Israel airstrikes Syrian Presidential Palace caught on live TV: इस्रायली सैन्याने दमास्कसमधील सीरियन संरक्षण मंत्रालयाची इमारत उडवून दिली. या भयानक हल्ल्याचे भयानक दृश्य लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झाले.

Bharat Jadhav

इस्रायल आणि सीरियामधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय. बुधवारी इस्रायली सैन्याने सीरियाची राजधानी दमास्कसमधील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाजवळ आणि राष्ट्रपती राजवाड्याजवळ हवाई हल्ले केले. या हल्ल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. अॅकर बातम्या देत असताना हा हवाई बॉम्ब हल्ला झाला. दमास्कसमधील एका वृत्तवाहिनीची अँकर स्टुडिओमध्ये बातम्या देत होती. स्फोटाच्या आवाजाने अॅकर घाबरली आणि स्टुडिओतून पळून गेली.

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी स्वतः हल्ल्याची पुष्टी केली. त्यांनी एक निवेदन जारी करत हल्ल्याची माहिती दिलीय. "दमास्कसमधील सीरियन लष्करी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराला लक्ष्य करण्यात आले." सीरियन सैन्याला सुवैदा येथून माघार घेण्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. या भयानक हल्ल्याचे भयानक दृश्य समोर आले आहेत. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

एका व्हिडिओमध्ये एक सीरियन न्यूज अँकर घाबरून पळून जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अँकर बातम्या वाचताना दिसतेय. तेव्हा अचानक मागून मोठा स्फोट होतो. आवाजाने घाबरून अँकर ओरडते आणि तिच्या सीटवरून खाली उतरून पळून जाताना दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: पार्लरमध्ये २-३ हजार रुपये खर्च करण्यापेक्षा घरीच करा केराटिन ट्रिटमेंट; केस होतील नॅचरली सॉफ्ट आणि सिल्की

Maharashtra News Live Update:- भाजपाला महिला आरक्षण द्यायचं नाही..केवळ राजकारण करायचे आहे - खासदार विशाल पाटील

खाडssss... कानाखाली जोरात लगावली; संतापलेल्या नवऱ्याने बायकोचा जीव घेतला

Tuesday Horoscope: पगार वाढ होणार, ५ राशींच्या अडचणी दूर होणार; वाचा मंगळवारचे खास राशीभविष्य

Mangal Gochar: मंगळ ग्रह राशी बदलताच येणार अच्छे दिन; ४ राशींचं नशीब पालटणार,घरी येणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT