Rising geopolitical tensions as Israel-Iran conflict fuels global concerns. saam tv
देश विदेश

Israel-Iran War: आखाती युद्ध वर्षभर चालणार? मोसाद उलथवणार खामेंनेईंची सत्ता?

Mossad Intelligence Change Power In Iran: मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे इराणमधील सत्ता उलथण्याची शक्यता आहे. इस्रायलमधील मोसादच्या प्रमुखांनी युद्ध सुरू होण्यापूर्वीच इराणमध्ये एका महिन्यात सत्ताबदल शक्य असल्याचं म्हटलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • इस्त्रायल-इराण युद्ध अधिक तीव्र होत आहे

  • युद्ध वर्षभर चालण्याची शक्यता व्यक्त

  • मोसादच्या संभाव्य कारवायांबाबत चर्चा

इराण आणि इस्त्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध आता नव्या वळणावर आलंय. बलाढ्य अमेरिकेसमोर दुबळ्या इराणची राजवट पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळेल, असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, इराणनं आपल्या युद्धसज्जतेनं इस्त्रायल-अमेरिकेच्या स्वप्नांना धुळीस मिळवलंय. शक्तीपेक्षा युक्तीवर भर देणाऱ्या इराणसारख्या देशात सत्तापालट करणं दोन्ही देशांसमोर कठीण होऊन बसलंय. अशातच आता नव्या इंटेलिजन्स रिपोर्ट आलाय आणि या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे पाहूयात.

इस्त्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या प्रमुखांनी युद्ध सुरू होण्यापूर्वीच इराणमध्ये एका महिन्यात सत्ताबदल शक्य असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता इराणमध्ये सत्ताबदलासाठी काही महिने नाही तर जवळपास 1 वर्षापर्यंतचा काळ लागू शकतो. इतकंच नाही तर मोसादचे प्रमुख डेविड बार्निया यांनी इस्त्रायली कॅबिनेटसमोर युद्धाचे संभाव्य परिणाम ,मांडतानाच तीन आठवड्यानंतरही इराणमध्ये खामेनींची पकड कायम आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी देखील इराणमधील खामेनी सत्तेसंदर्भात असंच भाष्य केलं होतं. त्यामुळे इतक्या दिवसांनंतरही इराणला झुकवणं शक्य झालं नसल्याची कबुलीच इस्त्रायलने दिली आहे. आखाती युद्धाला अजून महिनाही पुर्ण झालेला नाही तरी देखिल अर्ध्या जगावर इंधन टचाईचं संकट ओढवलंय. आता जर इराणच्या सत्तांतरापर्यंत युद्ध सुरु ठेवलं तर तोपर्यंत संपूर्ण जग वेठीस धरलं जाण्याची शक्यताच अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

SCROLL FOR NEXT