देश विदेश

Israel Iran War: अणूबॉम्ब नव्हे, इराणवर हल्ला करण्यामागे अमेरिकेचा वेगळाच हेतू; धक्कादायक कारण आलं समोर

इराणवर हल्ला करण्यामागे अमेरिकेचा हेतू वेगळाच असल्याची बाब समोर येत आहे.

Bharat Jadhav

इस्राइल आणि इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या संघर्षात अमेरिकेने उडी घेतली असून आज अमेरिकेने पहाटेच्या सुमारास इराणमधील तीन अणुकेंद्रांवर हल्ले केले. या हल्ल्यात इराणच्या अणुकेंद्रांचं मोठं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. इराण अणुबॉम्ब तयार करत असल्याचा दावा करत आधी इस्राइलने इराणवर हल्ला केला.

त्यानंतर अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करत हल्ला केला. मात्र इराणवर हल्ला करण्याचा हेतू वेगळाच होता. अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणवर हल्ला करण्यामागचा खरा हेतू काही वेगळाच असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान अमेरिकेने हल्ला केल्यामुळे मध्य पूर्वमध्ये तणाव वाढलाय.

दरम्यान हा भाग जगाच्या एकूण खनिज तेलाच्या उत्पन्नापैकी २६ टक्के खनिज तेल मिळतं. सौदी अरेबिया, इराक, इराण, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये जगातील आघाडीच्या १० खनिज तेल उत्पादक देशांमध्ये समावेश होतो. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्यासाठी अणुबॉम्बचं कारण देण्यात आले आहे. हल्ल्यामागील आणखी एक कारण म्हणजे इराणमध्ये मुबलक प्रमाणात असलेले खनिज तेलाचे साठे हेही या हल्ल्यामागचं एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

मध्य पूर्वेतील इतर आखाती देशांप्रमाणेच इराणमध्येही खनिज तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. इराणमधून दररोज ३.३ दशलक्ष बॅरल एवढं खनिज तेल उत्पादित केलं जातं. दररोज २ दशलक्ष बॅरल खनिज तेल आणि शुद्धिकरण केलेल्या तेलाची निर्यात केली जाते. तसेच त्यामधून इराणची अर्थव्यवस्था चालते.

इराणवर हल्ला करणाऱ्या डोनाल्ड ट्र्म्प यांची नजर या खनिज तेलाच्या साठ्यांवर असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. इराणमध्ये आपल्याला हवं तसं सत्तांतर घडवून तिथल्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा अमेरिकेचा हेतू असू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT