donald trump  Saam tv
देश विदेश

Israel Iran Conflict : 'खोमेनींना आत्ताच मारणार नाही'; विनाअट शरण या, अमेरिकेचा इराणला दम, VIDEO

Israel Iran Conflict update : इराण आणि इस्रायलच्या युद्धात आता अमेरिका उडी घेणार असल्याचं दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता खोमेनींना संपवणं सोप्प नाही. असं म्हणत खोमेनी कुठे आहेत याची पूर्ण कल्पना असल्याचं म्हणत शरण जा असं धमकावलंय. या धमकीनंतर खोमेनींनी काय केलं पाहा..

Snehil Shivaji

इस्रायल आणि इराणकडून सध्या एकमेंकावर बॉम्ब गोळे डागण्यात येतायेत. तर ट्विटरवर देखिल ट्विट वॉर तेही दोन देशांच्या सर्वौच्च नेत्यांमध्ये सुरु असल्याचं दिसतंय. इराण आणि इस्रायल युद्धात अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला थेट धमकावलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी सलग केलेल्या २ ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय. पाहूया

ट्रम्पनं टोचलं

'आम्हाला माहिती खोमेनी कुठं लपलाय. ते अगदी सहज सोप्पं टार्गेट आहे. पण आम्ही त्याला सध्या तरी मारणार नाही. पण निष्पाप नागरिक आणि अमेरिकन सैन्यावर हल्ला आम्ही खपवून घेणार नाही. आमची सहनशक्ती संपते.'

एका देशाच्या सर्वोच्च नेत्याला इतकी उघड उघड धमकी देऊनही ट्रम्प यांचा राग काही शांत झाला नाही तर त्यांनी दुसऱ्याच क्षणी पुन्हा 'विनाअट शरणागती' (आता ते ट्रम्पचं ट्विट मारा) असं ट्विट करुन इराणला कुठलीही अट न ठेवता शरणागती पत्करा असं म्हटलंय. या ट्विटवरुन इराण इस्रायलच्या युद्धात अमेरिका लवकरच उतरणार हे स्पष्टंय. मात्र ट्रम्पच्या धमक्यांना भीक घालतील ते खोमेनी कसले? ट्रम्प यांच्या ट्विटनंतर खोमेनींनी एकच ट्विट केलं आणि आता माघार नाही म्हणत धर्मयुद्ध पुकारलंय.

"लढाई सुरू होते. अली पुन्हा झुल्फिकार घेऊन खैबरला परततो."

इराणचे सर्वौच्च नेते खोमेनी यांनी या ट्विटच्या माध्यमातून जगभरातील मुसलमानांना साद घातलीये. खोमेनींनी इस्लाममध्ये अत्यंत पवित्र आणि मानाच्या स्थानी असलेल्या हैदर आणि अलींचा वापर करुन या युद्धाला इस्लामच्या एका ऐतिहासिक लढाई सोबत जोडलंय. खैबरची लढाई शक्तिशाली शत्रूवर विजयाचे प्रतीक म्हणून इस्लाममध्ये पाहिली जाते.

खोमेनींच्या या ट्विटनंतर इराणनं इस्रायलवर थेट हायपरसोनिक बॅलेस्टिक फतह - 1 या मिसाईलनं मारा केलाय. त्यामुळे आता इराणनं कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं ठरवल्याचं दिसतंय. त्यामुळे रामधारी सिंह दिनकर यांच्या काव्यपंक्तीप्रमाणे याचना नहीं अब रण होगा, जीवन या की मरण होगा? असा धर्मयुद्धाचा इशाराच दिलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT