देश विदेश

Israel-Hamas War:रस्त्यांवर वाहनं थांबत केला गोळीबार; इस्राइलमधील हमासच्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल

Israel-Hamas War : दक्षिणी इस्राइलच्या म्युझिकल फेस्टिव्हलमध्ये हमासने हल्ला केला होता. याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

Bharat Jadhav

Israel-Hamas War:

इस्राइल- हमास यांच्यात गेल्या १७ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हमास आणि इस्राइल एकमेकांवर रॉकेट हल्ले केले जात आहेत. याचदरम्यान एका हल्ल्यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ ७ ऑक्टोबरला हमासने इस्राइलच्या म्युझिकल फेस्टिव्हलमध्ये हल्ला केल्याचा असून इस्राइलने हा व्हिडिओ ऑफिशिअल अकाउंटवर शेअर केलाय.(Latest News)

हमासचे दहशतवादी गोळीबार करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.व्हिडिओमध्ये एक मोठा रस्ता दिसत आहे, त्यांनी वाहनांच्या साहाय्याने रस्ता ब्लॉक केलाय. यानंतर तेथे एका मोकळ्या जीपमध्ये हमासचे दहशतवादी तेथे येतात. आणि तेथे गोळीबार करू लागतात. तर काही दहशतवादी वाहनांवर चढतात आणि तेथील लोकांना टार्गेट करत त्यांच्यावर गोळीबार करतात. त्यानंतर तेथे उभ्या असलेल्या वाहने पेटवून देतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२६० नागरिकांचा झाला होता मृत्यू

इस्राइलने हा व्हिडिओ पोस्ट करताना एक कॅप्शन दिलंय. यात म्हटलंय की, हा व्हिडिओ नोवा फेस्टिव्हलमध्ये हमासने हल्ला केल्याचा आहे. या हल्ल्यात २६० नागरिकांचा मृत्यू झाला. नागरिक पळून जाऊ नये म्हणून दहशतवाद्यांनी रस्ता बंद केला होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी वाहनांवर गोळीबार केला आणि वाहने पेटवून दिले. जे लोक कारमधून उतरून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

इस्राइल आणि पॅलेस्टाइनच्या दहशतवादी संघटनेत होत असलेल्या या युद्धात आतापर्यंत ६ हजार लोकांचा मृत्यू झालाय. तर ४ हजार ६०० जण गाझा पट्टीतील आहेत तर १,४०० जण इस्राइलचे आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून गाझापट्टीत आतापर्यंत १४ हजार पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या युद्धामुळे जगात खळबळ माजली आहे. जगातील देश दोन गटात विभागले गेले आहेत. अमेरिका,ब्रिटन, फ्रान्स सारखे देश इस्राइलच्या बाजुने उभे आहेत. तर इरान आणि रशिया या देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलाय.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला हमासने पूर्वनियोजित करून केला होता. या हल्ल्याच्या योजनेला पाच युनिट्सकडून करण्यात आलाय. सर्वात आधी ७ ऑक्टोबरच्या सकाळी साडेसहा वाजता मिसाईल युनिटने तीन हजार रॉकेट इस्राइलच्या दिशेने सोडत हल्ला केला. त्यानंतर एअरबॉर्न यूनिटच्या मदतीने पॅराग्लाइडरने दहशतवाद्यांनी इस्राइलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लष्कर काटी आणि गाझापट्टीतून इस्राइलमध्ये दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

Success Story: शाळेसाठी दररोज ६ किमी पायपीट; शेतातही केले काम; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

Saturday Horoscope: पाच राशींच्या जीवनात येणार आनंदी-आनंद; होणार धन वर्षाव, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Bhadrapada Amavasya 2025: आजच्या शनी अमावस्येचं महत्त्व जाणून घ्या; 'या' चुका करणं टाळा

Pune: बैलगाडा शर्यतीत अपघाताचा थरार, तरुण खाली पडला अन्..., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT