Israel-Hamas War Saam TV
देश विदेश

Israel-Hamas War: एक हात मदतीचा...! युद्धात भारताकडून पॅलेस्टिनींना मदत; गाझामध्ये पाठवलं वैद्यकीय साहित्य

India Sends Medical Aid to Gaza: शनिवारी इजिप्तमधून गाझामध्ये ही मदत पाठवण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Israel-Hamas War:

इस्रायल आणि हमासच्या युद्धामुळे अनेक सामान्य नागरिकांचा नाहक बळी गेलाय. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने पॅलेस्टिनींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मोठी मदत पुरण्यात आलीये.

हमास आणि इस्रायल युद्धात दोन्ही बाजूच्या व्यक्तींचा बळी जातोय. सुरू असलेल्या विधवंसात औषधसाठाही कमी पडू लागलाय. आज गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. तसेच निवारण साहित्यही पाठवण्यात आले आहे. शनिवारी इजिप्तमधून गाझामध्ये ही मदत पाठवण्यात आली आहे.

भारताने पाठवलेलल्या मदतीबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती दिलीये. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिलंय की, भरताने पाठवलेल्या मदतीमध्ये सर्व जीवनावश्यक औषधांचा समावेश आहे. शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या वस्तू, तंबू, ताडपत्री, स्लीपिंग बॅग, स्वच्छताविषयक काही वस्तू पाठवण्यात आल्यात.

युद्धामध्ये हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या महितीनुसार, काउंटर स्ट्राइकमध्ये तब्बल ४,३०० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये जास्त प्रमाणात पॅलेस्टिनी नागरिकांचा समावेश होता.

युद्धामध्ये गाझा पट्टीवरील नागरिकांचा नाहक बळी गेलाय. त्यामुळे संपूर्ण जगभरात ठिकठिकाणी इस्रायल विरोधातही आंदोलने सुरू आहेत. या सर्व अंदोलनकर्त्यांना इस्रायल सरकारने कडक शब्दांत तंबी दिलीये. जे असे आंदोलन करतील त्यांना बसमध्ये बसवून गाझात पाठवले जाईल,असा इशारा इस्रायल सरकारने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT