Smoke rises over Beirut after Israeli airstrikes, escalating tensions despite Iran-US ceasefire agreement. Saam tv
देश विदेश

युद्धाची आग पुन्हा पेटणार? युद्धखोर इस्रायलनं युद्धविराम तोडला

Iran US Ceasefire: इराण- अमेरिकेत युद्धविरामासाठी करार झाला... इराणच्या 10 अटी मान्य करून अमेरिकेनं युद्धबंदीची अधिकृत घोषणा केली... मात्र याचं घोषणेनंतर इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या विध्वसंक हल्ल्यामुळे युद्ध पुन्हा पेटणार आहे... ते कसं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाली. आणि जगानं सुटकेचा निश्वास सोडला..मात्र हा आनंद क्षणभुंगर ठरलाय...एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये कागदावर करार होत असताना, दुसरीकडे इस्रायलनं लेबनॉनवर विध्वसंक हल्ला केला... इराणने 'होर्मुझची सामुद्रधुनी' खुली करावी आणि बदल्यात अमेरिकेने हल्ले थांबवावेत,असा करार झालेला असताना इस्रायलच्या युद्धखोर भूमिकेमुळे पुन्हा युद्धाचा वणवा पेटणार असल्याचं चित्र निर्माण झालाय...

युद्धविरामानंतर जगाचं लक्ष इराणकडे असताना, इस्रायलने अचानक लेबनॉनच्या हिजबुल्लावर मोठा हल्ला चढवला... अवघ्या 10 मिनिटांत बैरुत, बेक्का व्हॅली आणि दक्षिण लेबनॉनमधील 100 हून अधिक कमांड सेंटर्स उद्ध्वस्त करण्यात आली...या हल्ल्यात 254 लोक मारले गेले तर 1 हजारहून अधिक नागरिक जखमी झालेत...

दरम्यान इराणच्या IRGC नं होर्मुझ सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग पेरल्याचा संकेत देणारा नकाशा प्रसिद्ध केलाय...या नकाशात मोठे वर्तुळ करून पर्शियन भाषेत डेंजर झोन असं सांगण्यात आलंय....त्यामुळे जगाच्या इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम घडवून आणण्याचा इशारा इराणनं दिलाय... मात्र युद्धखोर इस्रायलनं इराणच्या धमकीला हलक्यात घेत... लेबनॉनवर हल्ले सुरु ठेवण्याचा इशारा दिलाय... इस्रायली पंतप्रधान ब्रेजामिन नेत्यनाहू काय म्हणाले ऐका...

"इराणसोबतच्या युद्धविरामात हिजबुल्लाचा समावेश नाही. त्यामुळे इस्रायल लेबनॉनवरील हल्ले सुरूच ठेवेल," दुसरीकडे इस्रायलच्या युद्धखोर भूमिकेमुळे आणि इराणनं होर्मुझमध्ये सुरुंग पेरल्याच्या संशयामुळे अमेरिकेच्या पायाखालची जमिनीच हादरलीय..त्यामुळे.ट्रम्प यांनी पुन्हा इराणच्या धमकीला प्रत्युत्तर दिलंय..

इराणसोबत झालेल्या नव्या कराराची पूर्णपणे अंमलबजावणी होईपर्यंत अमेरिकेच्या सर्व युद्धनौका, विमाने आणि सैन्य दल इराणच्या अवतीभवती तैनात राहतील. जर कोणत्याही कारणास्तव या कराराचे उल्लंघन झाले. तर असं युद्ध सुरू होईल जे जगाने यापूर्वी कधीही पाहिलं नसेल..ट्रम्प यांच्या या इशाऱ्यामुळे पुढील मोहिमेसाठी अमेरिकी सैन्य सज्ज असल्याचं आणि अमेरिका इज बॅकची भूमिका कायम असल्याचं पाहायला मिळतयं... त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील हा युद्धविराम किती काळ टिकणार? लेबनॉनवरील हल्ले इस्रायल थांबवणार का? आणि जर लेबनॉनवरील हल्ल्यामुळे इराणनं होर्मुझ जलमार्ग रोखल्यास शांततेचा हा शेवटा करार जगाला महायुद्धाच्या खाईत लोटणार का? याकडे जगाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: नवरा शरीरसंबंध टाळायचा, अचानक एक फाइल बायकोला सापडली; सत्य उघड होताच पायाखालची जमीन सरकली

कोल्हापुरातील धक्कादायक घटना! लग्नाच्या जाळ्यात अडकला तरुण; दोन एजंटने लावला लाखोंचा गंडा

Maharashtra Politics: दापोलीत राजकीय भूकंप; शिंदे गटाचा दे धक्का! राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

१७ एप्रिलपासून नियम बदलणार; HSRP प्लेट नसेल तर गाडीचे काम अडकणार, ₹१०००० चा दंडही बसणार

CM Resignation : मुख्यमंत्री राजीनामा देणार; दिल्लीत जाणार, बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT