Health Insurance Saam Tv
देश विदेश

Health Insurance: विमा कंपन्यांच्या मनमानीला चाप! आता 65 वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार आरोग्य विमा

IRDAI News: ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. 65 वर्षावरील वयाच्या ज्येष्ठ्यांनाही यापुढे आरोग्य विम्याचं कवच मिळणार आहे. कारण आरोग्य विम्याच्या पॉलिसमध्ये बदल करण्यात आले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Health Insurance:

ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. 65 वर्षावरील वयाच्या ज्येष्ठ्यांनाही यापुढे आरोग्य विम्याचं कवच मिळणार आहे. कारण आरोग्य विम्याच्या पॉलिसमध्ये बदल करण्यात आले आहेत. आता वयाचं कारण देऊन विमा कंपन्या ज्येष्ठांना आरोग्य विमा नाकारता येणार नाही.

धकाधकीचं जीवन, वाढते आजार यामुळे आरोग्य विमा अर्थात मेडिक्लेम आपल्या आयुष्याचा भाग बनलाय. हाच आरोग्यविमा काढताना ज्येष्ठ नागिरकांना अडचणींचा सामना करावा लागत. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही कारण IRDAI विम्याचे नियम शिथील केले आहेत.

त्यानुसार आता आरोग्य विमा काढताना वयाची अट असणार नाही. 65 वर्षांवरील ज्येष्ठांनाही विमा काढता येईल. याशिवाय गंभीर आजार असल्यास त्या व्यक्तीला मेडिक्लेम पॉलिसी नाकारता येणार नाही. 1 एप्रिल 2024 पासून हे नवे नियम लागू होतील.

यातच आता कितीही वय असले तरी आरोग्य विमा काढता येईल. कर्करोग, हृदयरोग, किडनी विकार, एड्स सारख्या आजारांना विमा नाकारता येणार नाही. आरोग्य विम्याचा प्रतीक्षा कालावधी 48 महिन्यांवरून 36 महिने करण्यात आलाय.

दरम्यान, यापूर्वी 65 वयापर्यंतच्याच व्यक्तिंना आरोग्य विम्याचा लाभ मिळत होता. मात्र आता नवीन निय़मानुसार सर्वांनाच विमा काढता येईल. ज्येष्ठांसाठी निश्चितच ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSC Result: विद्यार्थ्यांनो ऐकलं का ! उद्या बारावीचा निकाल,ऑनलाइन कसा पाहणार तुमचा रिझल्ट?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेल्या बसला अज्ञात वाहनाची धडक; १६ जण गंभीर जखमी

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू ; पुतण्यासह तीन जण जखमी, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT