Indian Railway New Service  Saam Tv
देश विदेश

Indian Railway New Service : रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होणार ! पैसे न देता बुक करा तिकीट, कसे ते जाणून घ्या

IRCTC Easy eTicketing : आता पैसे नसले तरी आपण ट्रेनचे तिकीट बुक करु शकतो. ते कसे जाणून घेऊया

कोमल दामुद्रे

IRCTC New Service : सर्वसामान्यासाठी ट्रेन हे सर्वात स्वस्त असे प्रवासाचे साधन आहे. अगदी कमी पैशात आपण कुठेही सहज प्रवास करु शकतो. दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. अशातच भारतीय रेल्वे प्रवशांच्या सोयीची व सुविधांची काळजी घेत असते.

IRCTC ने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची योजना आखली आहे. आता रेल्वेचा (Train) प्रवास अधिक सुखकर होणार आहे. अनेकदा आपल्या गावी किंवा लांब कुठे तरी जायचे असते परंतु, पैशांमुळे आपल्याला कुठे जाता येत नाही. अशातच रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता पैसे नसले तरी आपण ट्रेनचे तिकीट (Ticket) बुक करु शकतो. ते कसे जाणून घेऊया

जर तुमच्याकडे पैसे (Money) नसतील तर तुम्ही पैसे न भरता पेटीएम वरून ट्रेनची तिकीट बुक करू शकता. रेल्वेच्या या सेवेचे नाव बाय नाऊ पे लेटर असे ठेवण्यात आले आहे. माहिती देताना IRCTC ने सांगितले की पेटीएम पोस्टपेड सेवा आता रेल्वे अॅपमध्ये सक्षम करण्यात आली आहे. या सुविधेचा हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

1. कशी असेल सुविधा

  • भारतीय रेल्वेने पुरवलेल्या पेटीएम पोस्टपेड सेवेअंतर्गत प्रवासी कोणतेही पैसे न भरता तिकीट बुक करू शकतात.

  • लांबच्या प्रवासाचे तिकिटे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत याची प्रवाशांना चिंता करु नका.

  • जर तुम्हाला Paytm मध्ये Buy Now Pay Later कसे वापरायचे हे माहित नसेल, तर खाली देलेल्या स्टेप्स फॉलो करा

2. स्टेप बाय स्टेप बुकिंग प्रक्रिया

  • सर्व प्रथम, आपल्या स्मार्टफोनवर Google Play Store वरून IRCTC अॅप डाउनलोड करा आणि नंतर लॉग इन करा.

  • यानंतर तुम्ही तुमच्या प्रवासाचे नाव, तारीख, बोर्डिंग स्टेशनचे नाव भरा

  • आता तुम्हाला ज्या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे त्या निवडा आणि बुकिंगसाठी पुढे जा

  • यानंतर तुम्ही पेमेंट सेक्शनमध्ये पोहोचाल, त्यानंतर तुम्हाला Buy Now Pay Later चा पर्याय दिसेल.

  • यानंतर तुम्हाला पेटीएम पोस्ट निवडा आणि तुमचे पेटीएम लॉग इन करावे लागेल

  • आता तुमच्याकडे व्हेरिफिकेशन कोड असेल, तो भरल्यानंतर तुमचे तिकीट बुक केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election 2026: मुंबईत मनसेला भगदाड, भाजपनंतर शिवसेनेकडून धक्का, शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत

Destination Wedding Places : डेस्टिनेशन वेडिंग प्लान करताय? ही आहेत भन्नाट लोकेशन्स

Film Director Death: प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Irrfan Khan Birth Anniversary : इरफान खानने वाचवला होता जीव; आज 'तो' आहे IPS ऑफिसर, नेमका किस्सा काय?

Hairstyle Ideas: मकर संक्रांतीला काळ्या साडीवर खुलून दिसतील 'या' 5 हेअरस्टाईल्स; पारंपारिक लूकला मिळेल मॉडर्न टच

SCROLL FOR NEXT