US military build-up intensifies in the Middle East as Iran issues a strong warning amid rising war tensions. Saam Tv
देश विदेश

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

Middle East Tensions: इस्त्रायल-अमेरिका युद्धातून बाहेर न पडण्याचे स्पष्ट संकेत इराणनं दिलेत. अशातच आता इराणनं अमेरिकेला दिलेल्या धमकीनं जगाला धडकी भरलीये. इराणनं अमेरिकेला दिलेली धमकी नेमकी काय आणि त्याचे परिणाम नेमके काय होऊ शकतात पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

वेलकम टू हेल अर्थात नरकात तुमचं स्वागत आहे! हा कोणताही सिनेमाचा डायलॉग नाही, तर इराणने थेट महासत्ता अमेरिकेला दिलेला युद्धाचा इशारा आहे. इराणवर हवाई हल्ले करूनही हाती काही लागलं नसताना थेट जमीनवर उतरण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केलीय. अमेरिकेच्या 50 हजार सैनिकांनी इराणला वेढा घातलाय, महाकाय युद्धनौका समुद्रात तळ ठोकून आहेत. त्यामुळे अमेरिका इराणमध्ये लवकरच ग्राऊंड ऑपरेशन करणार असल्याची चर्चा रंगलीय...

अमेरिकेने मध्य पूर्वेतील आपली लष्करी तैनाती आणखी वाढवलीये. यूएस सेंट्रल कमांडनुसार, यूएसएस त्रिपोली नौकेवरील सुमारे 3500 मरीन कमांडो आणि खलाशी या प्रदेशात दाखल झाले आहेत. तसंच, 50000 अमेरिकी सैनिक आधीच तैनात केले असून मागील 20 वर्षांतील ही सर्वात मोठी लष्करी तैनाती ठरलीये. विशेष म्हणजे, यूएसएस त्रिपोलीचे 27 मार्चला आगमन मध्यपूर्वेत दाखल झालंय. यूएसएस त्रिपोलीवर जहाजावर आधुनिक शस्त्रे आणि विमाने तसेच लढाऊ उपकरणे तैनात केली आहेत. मरीन सैनिक, तसेच सीहॉक हेलिकॉप्टर, ऑस्प्रे वाहतूक विमाने आणि एफ-35 लढाऊ विमाने युद्धनौकेवर तैनात आहेत.

दुसरीकडे, अमेरिका इराणचं प्रमुख तेल निर्यात केंद्र असलेल्या खर्ग बेट ताब्यात घेण्यासाठी 10 हजार अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा विचार करतंय. त्यातच इराणने ही अमेरिकेलाही मोठा इशारा दिलाय. इराणनं नरकात आपले स्वागत आहे असं सांगत इराणच्या भूमीवर पाऊल ठेवणारा अमेरिकी सैनिक “शवपेटीतूनच परत जाईल, अशी थेट धमकी दिलंय. मात्र दोन्ही देशांची लष्करी ताकद किती आहे? पाहूयात...

अमेरिकेकडे अंदाजे 13 लाख सक्रिय सैनिक आहे तर इराणकडे अंदाजे 6 लाखांपेक्षा जास्त सक्रिय सैनिक आहे. अमेरिकेचं जगात सर्वाधिक संरक्षण बजेट अंदाजे 997 अब्ज डॉलर्स आहे. तर इराणचे संरक्षण बजेट 8 ते 15 अब्ज डॉलर्स दरम्यान आहे. तसंच, अमेरिकन हवाई दलाकडे 13 हजारांहून अधिक लढाऊ विमाने असून इराणच्या वायूसेनेकडे फक्त 550 लढाऊ विमाने आहेत. इराणकडे सध्यातरी एकही अण्वस्त्र नसून अमेरिकेकडे तब्बल 5 हजारांहून अधिक अण्वस्त्रे आहेत. याशिवाय, अमेरिककडे जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलं तरी इराणकडे मध्य पूर्वेतील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सर्वात मोठा आणि विध्वंसक शस्त्रसाठा आहे.

आधीच या युद्धात इराणला कमी लेखणं अमेरिकेला चांगलचं महागात पडलंय. अशातच आता एकीकडे, बलाढ्य अमेरिकेची लष्करी ताकद तर दुसरीकडे इराणचा कडवा प्रतिकार अशी स्थिती या युद्धात पाहायला मिळतेय. त्यात अमेरिकेची युद्धसज्जता पाहता इराणच्या भूमीत घुसून अमेरिकी सैन्य इराणला बेचिराख करणार का? की इराण 'वेलकम टू हेल'चा शब्द खरा करुन दाखवणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

Beed Crime: ग्रामसभेत तुम्ही यायचे नाही! तिघांवर टोळक्याचा लाठ्या काठ्यांनी हल्ला; Video Viral

अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? भोंदूगिरीच्या पडद्याआड 'ब्लॅक मनी'चा खेळ

इराण-अमेरिका युद्धात दहशतवाद्यांची एन्ट्री, हुथी दहशतवादी करणार जगाची नाकेबंदी?

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातचा काळाचिठ्ठा बाहेर येणार, शिवनिका ट्रस्टचा सीए करणार पोलखोल

SCROLL FOR NEXT