इराण-अमेरीकेमध्ये युद्धविरामाची ठोस चर्चा होत नसतानाच इराणच्या नव्या इशाराने जगावर ब्लॅकआऊटचं संकट ओढावलंय. होर्मुझच्या जलमार्गातून जाणाऱ्या डेटा केबल्सच्या सुरक्षेबाबत इराणनं दिलेल्या इशाऱ्याचे भारतावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण आखाती देशांशी असलेले भारताचे व्यापारी, बँकिंग आणि डिजिटल संबंध या केबल्सवर अवलंबून आहेत.... या मार्गावर कोणताही घातपात झाल्यास भारतीय कंपन्यांची सेवा विस्कळीत होऊ शकते...डेटा कनेक्टिव्हिटीवरही मोठा परिणाम होऊ शकतो....
होर्मुझ सामुद्रधुनीच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सवर युद्धाचं सावट आहे. महत्त्वाचं म्हणजे, जगातील 95 टक्के इंटरनेट डेटा हा उपग्रहाद्वारे नाही तर समुद्राच्या तळाशी असलेल्या याच फायबर ऑप्टिक केबल्समधून चालतो. या केबल्स इराण आणि ओमानमधील होर्मुझ सामुद्रधुनी तर तिकडे रेड सी मधील बाब अल-मंडेब या दोन मार्गावरून जातात. याच मार्गांवर असलेलं भारताचं आखाती आणि युरोपीय देशांशी जोडणारं इंटरनेट केबल्सचं जाळं आहे... त्यात भारताची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रामुख्याने अरबी समुद्रातून आखाती देश आणि युरोपमधून येणाऱ्या केबल्सवर अवलंबून आहे.
गेल्या काही वर्षांत मोठ्या कंपन्यांनी मध्य पूर्वेमध्ये गुंतवणूक केली आहे. Amazon, Google आणि Microsoft सारख्या कंपन्या तेथे डेटा सेंटर आणि AI पायाभूत सुविधा उभारत आहेत. या डेटा सेंटर्सना जगाशी जोडणाऱ्या अनेक केबल्स होर्मुझ परिसरातून जातात. तज्ञांच्या म्हणण्यानुसार समुद्राखाली टाकलेल्या हजारो किलोमीटरच्या फायबर-ऑप्टिक केबल्स जगातील इंटरनेटचा खरा कणा आहेत.
समुद्राखाली लपलेले इंटरनेटचे जग
आज जगात 400 हून अधिक प्रमुख इंटरनेट केबल नेटवर्कस् आहेत. ही केबल्स समुद्राच्या तळापासूनही काही मीटर खाली आहे. ही केबल प्रकाशाच्या वेगाने डेटा प्रसारित करते. आखाती देशांच्या समुद्रातून जाणारं हे इंटरनेटचं महाजाल आशिया, आफ्रिका आणि युरोपला जोडत
म्हणूनच युद्ध चिघळलं आणि थेट समुद्रात पोहचलं तर जगाचं इंटनेट ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण याआधी 2024 मध्ये हुथी बंडखोरांच्या हल्ल्यांमुळे बाब अल-मंडेबमधील फायबर ऑप्टिक केबल्स उद्धवस्त झाल्या होत्या...ज्या पूर्ववत करण्यासाठी अनेक महिने लागले होते.आता इराणच्या जल सुरुंगांच्या टार्गेटवर होर्मुझमधील केबल्स आहेत. त्यामुळे इराणनं या केबल्स उद्धवस्त केल्यास जगातील इंटरनेट सेवा ठप्प होईल. आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी अनेक वर्ष लागतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.