Iran and US delegations conclude 21-hour talks in Islamabad without agreement as Pakistan’s mediation effort falls apart. Saam Tv
देश विदेश

चर्चा फिस्कटली, संघर्ष अटळ, मध्य-पूर्वेत पुन्हा युद्ध पेटणार? जगात खळबळ

Middle East Tensions: इस्लामाबादमध्ये तब्बल 21 तास चाललेली इराण-अमेरिका यांच्यातील चर्चा अखेर निष्फळ ठरलीये. या चर्चेसाठी मध्यस्थी करण्याच्या नादात पाकिस्तान कसा तोंडघशी पडलाय, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

11 एप्रिल... ठिकाण... इस्लामाबाद... तात्पुरत्या युद्धबंदीला कायमस्वरूपी थांबवण्यासाठी इराण-अमेरिका यांच्यात खलबतं सुरू झाली... यासाठी दोन्ही देशांचं शिष्टमंडळ आमने-सामने बसलं... संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्या इस्लामाबादमधील शांतता बैठकीदरम्यान इराण-अमेरिका यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालीये. मात्र, वाटाघाटीसाठी सुरू असलेली ही बैठक अखेर निष्फळ ठरलीये. इराण-अमेरिका यांच्यातील चर्चा दोन मुद्यांवर रखडलीये...

वाटाघाटींच्या बैठकीत होर्मुझ जलमार्ग या प्रमुख मुद्द्यावर चर्चा झाली. टोल वसुली आणि पूर्ण नियंत्रण कायम राहावं, अशी भूमिका इराणनं घेतलीये. तर अमेरिकेनं जुनी व्यवस्था ठेवण्याचा पवित्रा घेतलाय. दुसरीकडे, युरेनियम समृद्ध देश होण्याचा अधिकार आम्हाला आहे, अशी भूमिका इराणनं घेतलीये. तर इराणनं आपले आण्विक कार्यक्रम तात्काळ बंद करावे, असा पवित्रा अमेरिकेनं घेतलाय.

पाकिस्तान मध्यस्थी करण्याच्या नादात स्वतःचं तोंडघशी पडलाय. तब्बल 21 तास बंद दाराआड चाललेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांचे नेते कुठल्याही ठोस तोडग्याविना मायदेशात रवाना झालेत. मात्र, कंगाल पाकिस्ताननं आपलं अपयश लपवण्यासाठी जगाला पुन्हा एकदा आशेवर ठेवलंय.

मात्र, या 21 तासांच्या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या दोन आठवड्यांचा युद्धविराम कितीकाळ टिकणार याची भीती जगाला सतावू लागलीये. इतकंच नाही तर मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानची तेलवाहू जहाज अडवून इराणनं चांगलीच कोंडी केलीये. युद्धामुळे इंधनकोंडी झाल्याने संपूर्ण जगाला झळ बसली आहे. आता चर्चा फिस्कटल्याने आखात पुन्हा युद्धात होरपळून पाकिस्तान मध्यस्थीच्या नादात तोंडघशी पडणार का? की अमेरीका नमतेपणाची भूमिका घेणार याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahi Kachori Recipe: नाश्त्याला कांदे पोहेच कशाला? बनवा खुसखुशीत दही कचोरी, सोपी आहे रेसिपी

11th Online Admission : १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणीची मुदत वाढवली

Maharashtra News Live Update:नांदेड जिल्ह्याचा तापमान 43° अंश डिग्री सेल्सिअसवर

Nauvari Saree Buying : ऑनलाइन नऊवारी साडी खरेदी करताय? 'या' ५ गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर पैसे जातील वाया

High Blood Pressure : खतरनाक आहेत हाय BP ची 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरेल

SCROLL FOR NEXT