Tensions rise in the Middle East as Iran shuts the Strait of Hormuz and the US launches retaliatory airstrikes, sparking fears of a global oil crisis. saam tv
देश विदेश

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद, इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा भडकला

Iran Us Conflict Strait Of Hormuz Closed Oil Crisis: आखाती देशात पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. युद्धविरामानंतर इराण आणि अमेरीका पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. इराणने पुन्हा एकदा होर्मुझचा जलमार्ग बंद केलाय. याचा परीणाम जागतिक तेल व्यापारावर होणार आहे. पाहूया एक रिपोर्ट

Saam Tv

पश्चिम आशियात पुन्हा एकदा इराण- अमेरिका संघर्ष सुरु झालाय..शनिवारी रात्री इराणने व्यापारीदृष्ट्या महत्वाची होर्मुझची सामुद्रीधुनी बंद केलीय. यानंतर काही तासांतच अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हल्ले सुरु केले. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर गेल्या महिन्यात झालेल्या तात्पुरता युद्धविरामावर आता गंभीर प्रश्रचिन्ह निर्माण झालंय. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर इराणनं कतार, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोनद्वारे भीषण हल्ले केलेय. कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. नक्की पुन्हा युद्धाची ठिणगी का पडली? ते पाहूया..

इराणने असा दावा केलाय की सायप्रसच्या एका व्यापारी जहाजानं सुरक्षा नियमांचं उल्लघन केलंय..त्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) जहाजावर थेट गोळीबार केला. त्यानंतर जहाजाला आग लागली.होर्मुझची सामुद्रधुनी पुढील आदेशापर्यंत बंद राहील अशी घोषणा इराणे केली आहे. दुसरीकडं अमेरिकेच्या 'सेंट्रल कमांडनं दिलेल्या माहितीनुसार इराणच्या सुमारे 140 लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजं आणि सागरी वाहतुकीला लक्ष्य करण्याची इराणची क्षमता कमकुवत करणे हा अमेरीकेच्या हल्ल्यांचा उद्देश आहे.

दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते, अयातुल्ला मोजतबा खामेनी यांनी आपल्या पहिल्या जाहीर भाषणात, माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली. ते म्हणाले, "शहीद नेत्याच्या रक्ताचा बदला कोणत्याही परिस्थितीत घेतला जाईल." या वक्तव्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एक हजार क्षेपणास्त्र इराणच्या दिशेने तैनात केल्याची धमकी दिली आहे. जर हा संघर्ष कायम राहिला तर तेलाच्या किंमती गगनाला भिडू शकतात..भारतासाठी ही युद्धाची परिस्थिती अधिक गंभीर ठरु शकते..कारण भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 85 टक्के कच्चे तेल आयात करतो.

दरम्यान तणाव कमी करण्यासाठी ओमानने मध्यस्थाची भुमिका स्वीकारली आहे. इराण आणि ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये सागरी सुरक्षेबाबत चर्चा सुरुय. अमेरीका आणि इस्त्राईलने 28 फेबुवारीला इराणवर पहिला हल्ला केला. इराण आणि शत्रू राष्ट्रांमधील थेट युद्ध साधारणपणे 108 दिवस चालले होते. ही लष्करी कारवाई 14 जून 2026 रोजी शांतता करारानंतर थांबली होती. जून 2026 च्या मध्यावर युद्धविराम झाला असला तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 जुलै 2026 च्या सुमारास हा युद्धविराम संपल्याची घोषणा केली आहे.

होर्मूझ बंद झाल्यानंतर इंधनाची कशी कोंडी झाली ते सगळ्याच देशांनी अनुभवलंय. आता पुन्हा तशी स्थिती निर्माण होण्याची आणि आखाती देश पुन्हा होरपळून निघण्याची भिती आहे. जगाला युद्ध नको शांतता हवी आहे. इराण आणि अमेरीका संयमाची भूमिका घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवत मध्ये सुप्रिया सुळे यांनी थापल्या वारकऱ्यांसाठी भाकऱ्या

Hair Care: काही महिन्यातच केस होतील लांब आणि घनदाट; वापरा घरी तयार केलेलं 'हे' असरदार तेल

रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राचा संकल्प; ३ वर्षांत १४५ उड्डाण पूल-CM फडणवीस

मुख्यमंत्र्यांची मोठी खेळी;10 आमदार देणार AIADMK पक्षाचा राजीनामा; राजकारणात मोठी खळबळ

Mix Bhaji Recipe : पावसाळ्यात घरच्या घरी बनवा कुरकुरीत मिक्स भजी; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल

SCROLL FOR NEXT