Iran saam tv
देश विदेश

इराणनं उतरवला अभेद्य इस्त्रालयचा तोरा, इराणचा मोसादच्या मुख्यालयावर हल्ला, इराणनं भेदलं इस्त्रायलचं 'सुरक्षा कवच|VIDEO

इराणनं इस्त्रायलमधील गुप्तचर संस्था असणाऱ्या मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केलाय. इतकचं नाही तर इराणनं इस्त्रालयचं सुरक्षा कवच असणारं आयर्न डोमही उध्वस्त करून टाकलयं. या दोन देशांमधील घमासान युद्ध कुठल्या थराला जाऊ शकतं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

ही दृश्य आहे.. इराणनं इस्त्रायलच्या तेल अवीवमधील मोसादच्या मुख्यालयावर केलेल्या विध्वसंक हल्ल्याची. पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या इराण- इस्त्रायल युद्धाचा आता भडका उडालाय. संघर्षाला सुरुवात झाल्यावर इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादनं इराणच प्रचंड नुकसान केलं. मात्र याचं मोसादच्या मुख्यालयावर हल्ला करून इराणनं इस्त्रायलची झोप उडवलीय. इराणच्या क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील तेल अवीव, हायफा शहरांचं मोठं नुकसान केलयं. मोसादच्या मुख्यालयावरील हल्ला इराणसाठी का महत्त्वाचा होता. पाहूयात..

इराणचा मोसादवर हल्ला का?

7 वर्षांपूर्वी इराणंमध्ये मोसादची मोठी मोहीम

या ऑपरेशनमध्ये मोसादनं मिळवली इराणच्या छुप्या अण्वस्त्र केंद्राची माहिती

इराणच्या अणुबॉम्बच्या तयारीनं इस्त्रालयकडून ऑपरेशन 'रायजिंग लायन'ला सुरुवात

युद्धाला सुरुवात झाल्यावर मोसादचे एजंट तेहरानमध्ये सक्रीय

मोसादच्या माहितीमुळेच इराणच्या अणवस्त्र प्रकल्प आणि सैन्य ठिकाणावर हल्ले

मोसादकडून इराणमधील अणुशास्त्रज्ञ आणि १३ महत्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांची हत्या

दरम्यान संघर्ष वाढल्यानं इराणनं इस्त्रायलवर 370 क्षेपणास्त्र डागली या क्षेपणास्त्रांमध्ये फतेह-1, फतेह-2, खोरमशहर-4, इमाद आणि कादरसारखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश होता. यावेळी इस्त्रायलनं इराणच्या बॅलेस्टिक मिसाईलचा मारा परतवून लावला. मात्र इराणच्या एअर डिफेंन्स सिस्टमनं एआयचा वापर करुन सुरक्षा कवच म्हणून ओळखलं जाणारं इस्त्रायलचं आयर्न डोमही उद्धवस्त केलाय. त्यामुळे इस्त्रायलसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

दुसरीकडे इराणच्या आर्मी चीफनां मारल्याची घोषणा इस्त्रायलकडून करण्यात आलीय. त्यामुळे आता या दोन देशांमधील युद्ध अदिक विध्वसंक होण्याची शक्यता आहे. मध्य पूर्वेतील हा युद्धाचा भडका जगातील राजकीय घडामोडींवर कसा परिणाम करेल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT