Missiles and explosions intensify in the Middle East as Iran rejects Trump’s ultimatum, raising fears of a prolonged war with the United States Saam Tv
देश विदेश

इराणने दिला आरपारचा इशारा, माघारीस नकार, युद्ध लांबणार

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध आता लांबण्याची चर्चा रंगलीय...कारण इराणनं ट्रम्प यांच्या धमकीला भीक न घालता युद्धातून माघार घेण्यास नकार दिलाय... ट्रम्प यांनी इराणला नेमकी काय धमकी दिली होती... आणि इराणने ट्रम्प यांची धमकी कशी धुडकावून लावलीय...पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

अमेरिका-इराण युद्धाला दहा दिवस उलटले...मात्र युद्ध थांबण्याचं चित्र नाही... अमेरिका आणि इस्त्रायल इराणच्या तेल डेपोवर तर इराण इस्त्रायलच्या रिफायनरीवर मिसाईल हल्ले चढवतोय.....त्यामुळे हे युद्ध लांबणार असल्याचे चर्चा रंगलीय...आणि त्याला कारण ठरलंय.. इराणने ट्रम्प यांच्या धमकीला भीक न घालता थेट अमेरिकेविरोधात दहा वर्षे लढण्याचा दिलेला इशारा...

इराणने एवढी आक्रमक भूमिका घेण्यामागचं कारण आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अमेरिकेच्या अटीवर शरण येण्याची दिलेली धमकी... अमेरिकेच्या अटीवर इराण शरण न आल्यास 20 पट भीषण हल्ले चढवण्याची धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली... मात्र इराणने अमेरिकेच्या दादागिरीला खुलं आव्हान दिलंय..

आता इराणमध्ये विध्वंस घडवणाऱ्या ट्रम्प यांना इराणने आरपारचा इशारा दिलाय.. एवढंच नाही तर इस्त्रायलसोबतच मध्य पूर्वेत अमेरिकेच्या लष्करी तळांवर इराणने भीषण हल्ले सुरु केलेत... त्यामुळे ट्रम्प यांच्यावर नाक कापलं जाण्याची नामुष्की येण्याची चिन्हं असताना त्यांनी शांततेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर तब्बल तासभर चर्चा केल्याची माहिती पुतीन यांनी दिलीय...

एका बाजूला शांततेची चर्चा, दुसरीकडे धमक्यांचं सत्र... आणि आखाती देशांमध्ये बॉम्ब आणि मिसाईलचा वर्षाव... ज्यात हजारो नागरिकांचा बळी जातोय.... होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यानं संपूर्ण जगापुढं तेल संकट उभं ठाकलंय.... याच युद्धामुळे जग महामंदीच्या खाईत लोटलं जाण्याची शक्यता आहे... त्यात आता इराण इरेला पेटल्यानं व्हिएतनाम आणि अफगाणिस्तानप्रमाणे अमेरिकेचं इराणविरुद्धच्या युद्धातही नाक कापलं जाणार का? याकडे जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Wearing Rules: 'या' ३ राशींसाठी चांदी आहे घातक; नशिबी येते दारिद्रय, 'राजाचा होतो रंक'

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर थेट घरात आणि हॉटेलमध्ये घुसली कार

Frequent urination: दिवसातून किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल आहे?

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT