US THAAD missile defense system designed to intercept ballistic missiles during flight. Saam Tv
देश विदेश

इराणचं धाड-धाड, उडवून टाकलं थाड, अमेरिकन संरक्षण प्रणाली इस्रायलमध्ये फेल

Iran Missile Strike Challenges America: इराणविरोधातील युद्धात अमेरिकेनं इस्त्रायलला थाड मिसाइल डिफेन्स प्रणाली दिली खरी पण ती क्षेपणास्त्रांच्या माऱ्यासमोर फेल गेलीयेत. किती शक्तिशाली आहे ही अमेरिकन संरक्षण प्रणाली.

Saam Tv

सहापट मोठ्या अमेरिकेला आणि लष्करी शस्त्रसामग्रीनं सज्ज असलेल्या इस्रायलाही इराणनं जेरीस आणलंय. अमेरिकन मिसाईल डिफेन्स सिस्टमच्या सुरक्षेत बसून शेजारील राष्ट्रांना डोळे दाखवणाऱ्या इस्रायलवर आता इराणनं घाव घालायला सुरुवात केलीये. इराणी क्षेपणास्त्रानं आता अमेरिकेलाही तोंडघशी पाडलंय. कारण इस्रायलच्या सुरक्षेसाठी लावलेल्या थाड संरक्षण प्रणालीला भेदून इराणनं इस्रायल लक्ष केल्यानं अमेरिकेचंही टेन्शन वाढलंय. ही थाड संरक्षणप्रणाली काय आहे पाहा,

अमेरिकन मिसाइल डिफेन्स प्रणाली म्हणजे काय?

शत्रुचं मिसाइल आकाशातच पाडून नष्ट करणारी डिफेन्स प्रणाली

रडार मिसाईल ओळखतो अन् त्यावर इंटरसेप्टर मिसाईल मारा करतो

इंटरसेप्टर मिसाइल धडकताच शत्रूचं मिसाईल नष्ट करण्यासाठी थाड प्रणाली

स्फोटक नसतानांही धडक देऊन मिसाईल नष्ट करण्यासाठी उपयुक्त

थाडची बॅटरीची किंमत एक अब्ज डॉलर्स म्हणजेच 8 हजार 300 कोटीं रुपये

THAAD द्वारे शत्रूचं मिसाइल जमिनीवर पडण्याआधीच आकाशात नष्ट करणारी प्रगत संरक्षण प्रणाली असूनही इराणी मिसाईल इस्रायलमध्ये घूसून विध्वंस करतायेत. लष्करी तळांना सहज लक्ष करतायेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या मिसाइल हल्ल्यापासून संरक्षण करणारी ही डिफेन्स प्रणाली इराणनं पुरती फोल करुन दाखवलीये. इराणवरील हल्ल्याला सडेतोड उत्तर देऊन अमेरिकेच्या संरक्षणप्रणालीचे लक्तरं इराणनं वेशीला टांगलीयेत. त्यामुळे अमेरिकन थाड प्रणालीच्या सुरक्षा कवचात बसलेल्या साऊथ कोरीया, युएईसारख्या राष्ट्रांचंही टेन्शन इराणनं वाढवलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोलापूरमध्ये जुनी मिल कंपाऊंड परिसरात छऱ्याच्या गोळ्यांचा स्फोट

मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; भावाने घेतला तडकाफडकी निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शाळा... अवघ्या २४ तासांत दुसऱ्यांदा PM मोदींचं नागरिकांना आवाहन, १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर

MIM च्या नेत्याचं नगरसेवकपद जाणार? महापालिका झटका देणार, काय आहे प्रकरण?

Sabja Seeds For Hair Growth: केसांच्या वाढीसाठी सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT