Smoke rises over Tehran following reported explosions as allegations of toxic chemical weapons spark fears of escalating Iran-Israel conflict. Saam Tv
देश विदेश

इराण-इस्रायल संघर्ष जैविक युद्धाकडे? युद्धात 'टॉक्सिक बॉम्ब' चा वापर ?

Israel Iran Conflict: इराण-इस्रायल अमेरिकेमधील संघर्ष आता जैविक युद्धाकडे चाललाय... इस्रायलनं टॉक्सिक बॉम्बचा वापर करून इराणी नागरिकांमध्ये कसं भीतीचं वातावरण निर्माण केलयं... टॉक्सिक बॉम्ब नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

इराणची राजधानी तेहरानच्या आकाशातले धूराचे हे लोट ...1 कोटी लोकसंख्येचे हे शहर आता दहशतीच्या छायेखाली आहे... कानठळ्या बसवणाऱ्या याचं स्फोटातून इस्रायलनं ऑपरेशन तेहरानमधून इराणच्या काळजावर घाव घातलाय..कारण इस्रायलवर टॉक्सिक बॉम्बचा वापर केल्याचा आरोप होतोय... क्षेपणास्त्र हल्ल्यांपर्यंत आता हे युध्द मर्यादीत राहणार नसून त्याची वाटचाल आता आता केमिकल युद्धाकडे सुरू झालीय.

इस्रायलनं दक्षिण लेबनॉनमध्ये मोठे हल्ले केलेत..यात हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलयं...या हल्ल्यात टॉक्सिक केमिकलने बनलेल्या बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा आरोप केला जातोय... या बॉम्बमध्ये ग्लायफोसेटसारखी घातक रसायन असल्यानं त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होईल.

दरम्यान इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमधील 10 हजार नागरी वसाहतींच नुकसान झालयं...तर तेहरानमधील तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये असिड रेन झाल्याची चर्चा आहे. तेहरानमधील तेल साठ्यांवरील हल्ल्यात इस्रायलनं टॉक्सिक बॉम्बचा वापर केल्याचा चर्चा... त्यामुळे हल्ल्यानंतर अॅसिड रेनची भीती वाढली... हल्ल्यानंतर पडणारा पाऊस हा सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्सचे 'टॉक्सिक कॉकटेल' स्वरुपातील असल्याचं बोललं जातयं... या पावसाचा एक थेंबही शरीरावर पडल्यास त्वचा भाजणं किंवा कायमस्वरूपी जखमा होण्याचा धोका आहे. इतकेच नाही तर यातील विषारी वायू फुफ्फुसांना गंभीर इजा पोहचवू शकतो...त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि घराचे एसी बंद ठेवण्याचे कडक निर्देश दिलेत.

दुसरीकडे इराणनेही इस्रायलविरोधात क्लस्टर बॉम्बचा वापर सुरु केल्यानं दोन्ही देशांमधील संघर्ष आता केमिकल युद्धाकडे वळू लागलाय...एकूणच, हे युद्ध आता मानवी अस्तित्वावर घाला घालणारे ठरतेय.... त्यामुळे 'टॉक्सिक ब़ॉम्बचा हल्ला फक्त इराणसाठी नाही, तर जगासाठी धोक्याची घंटा आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vertical Property Card: सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक फ्लॅट मालकाला मिळणार ‘ खास कार्ड’, काय आहेत फायदे?

Waking up at 3am: रात्री नेमकी ३ वाजताच जाग येते? कारणं जाणून घ्या आत्ताच

Maharashtra News Live Update: बारामती-राहुरी पोटनिवडणूक सार्वजनिक सुट्टी, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय

Bollywood Couple Pregnant: पुन्हा गोड बातमी! बॉलिवूड स्टार कपलच्या घरी 'बेबी नं. 2'ची चाहूल

Bigg Boss Marathi 6 : थेट घराबाहेर पडणार 'हा' सदस्य, टॉप ५ च्या शर्यतीतून विजेतेपदाचा तगडा स्पर्धक OUT

SCROLL FOR NEXT