Indian oil tanker under tension in the Strait of Hormuz amid Iran firing incident saam tv
देश विदेश

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

इराणनं भारताच्या तेल टँकरवर फायरिंग करून थेट पाठीत खंजीर खुपसलाय. त्यानंतर गद्दार इराणला भारतनं झाप झाप झापलं... विशेष म्हणजे, फायरिंगदरम्यान कॅप्टनने केलेल्या संवादाची रेकॉर्डिंगही समोर आलीये... पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट...

Bharat Mohalkar

होर्मुझ जलमार्गाच्या नाकेबंदीवरुन इराण आणि अमेरिकेतील संघर्ष टोकाला गेलाय.. मात्र या संघर्षात इराणनं स्वतःच्याच पायावर धोंडा मारुन घेतलाय... भारताला मित्र मित्र म्हणणाऱ्या इराणनंच भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय... इराणनं होर्मुझमधून जाणाऱ्या जग अर्णव आणि सनमार हेराल्ड या दोन भारतीय तेलाच्या जहाजावर गोळीबार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय... आता मित्रानंच गद्दारी केल्यानं भारतही आक्रमक झालाय... भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं थेट इराणचे राजदूत अब्दूल माजीद हकीम इलाही यांना बोलावून चांगलंच झापलंय... भारताच्या संतापानंतर इराण चांगलाच नरमलाय.. आणि इराणला 5 हजार वर्षांची भारतासोबतची मैत्री आठवलीय..

खरंतर अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मुझवरुन तणाव वाढलाय... मात्र इराणनं आधी होर्मुझ जलमार्ग खुला केल्याची घोषणा केली... आणि त्यानंतर भारतीय जहाजं होर्मुझमधून जात असतानाच इराणी रिव्हॉल्यूशनरी गार्डनं भारतीय जहाजांवर जोरदार गोळीबार केला....त्यावेळचं जहाजावरचं कॉल रेकॉर्डिंग समोर आलंय... खरंतर इराणनं भारताची खोड काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.. तर याआधीही भारताच्या दिशेनं येणाऱ्या मयुरी नारी जहाजावरही हल्ला केला होता.... त्यामुळे भारत इराणला मेडिकल साहित्य, जीवनावश्यक वस्तू पाठवून मैत्री निभावत असतानाच इराण मात्र गद्दारी करताना दिसतोय...

त्यामुळे अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणनं विनाकारण भारताला ओढू नये...कारण भारत तेलासाठी काही प्रमाणात होर्मुझवर अवलंबून असला तरी इराणने पुन्हा भारताची खोड काढली तर भारत पाकिस्तानसारख्या इराणच्या नांग्या ठेचू शकतो.... हे इराणनं लक्षात ठेवायला हवं...कारण भारत मैत्री निभावतो ती टोकाची... आणि भारताच्या वाटेला गेलं.. तर उत्तर देतो... तेसुद्धा टोकाचंच.... त्यामुळं आता तरी इराणनं शहाणं होऊन भारताच्या नादी लागू नये... एवढंच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT