Anika Rastogi Death Saam TV
देश विदेश

Crime News : धक्कादायक! IPS अधिकाऱ्याच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू; विद्यापीठाच्या वसतिगृहात आढळला मृतदेह

Anika Rastogi Death : राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. अनिका रस्तोगी (वय 19) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

Satish Daud

प्रमोद जगताप, साम टीव्ही

उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरात एक धक्कादायक घटना घडली. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला. अनिका रस्तोगी (वय 19) असं मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनिका ही आयपीएस अधिकारी संतोष रस्तोगी यांची मुलगी होती.

तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिका एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. रविवारी रात्री ती आपल्या वसतिगृहाच्या खोलीत गेली. त्यानंतर तिने दरवाजा उघडला नाही.

मैत्रिणींनी आवाज देऊनही तिने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, सेक्युरिटी गार्डने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा अनिका ही बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळून आली. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी अनिकाला मृत घोषित केले.

अनिकाच्या अचानक मृत्युमुखे संपूर्ण विद्यापीठ प्रशासन हादरवून गेले आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आशियाना पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, शवविच्छेदन अहवालातच अनिकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून अनिकाच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. अनिकाच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी सर्वजण पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. जे काही सत्य समोर येईल ते पुढे शेअर करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT