आयएनएस विशाखापट्टणम आज नौदलात; स्वदेशी युद्धनौकेनं नौदलाची ताकद वाढणार  Saam Tv
देश विदेश

आयएनएस विशाखापट्टणम आज नौदलात; स्वदेशी युद्धनौकेनं नौदलाची ताकद वाढणार

पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रुराष्ट्रांचे आव्हान ओळखून भारत सध्या संरक्षणाच्या मुद्यावर सर्व पातळीवर काम करताना दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रुराष्ट्रांचे आव्हान ओळखून भारत सध्या संरक्षणाच्या मुद्यावर सर्व पातळीवर काम करताना दिसून येत आहे. यामुळे देशाच्या भूसीमांबरोबरच सागरी सीमा देखील संरक्षित करणे आता गरजेचे आहे. या दृष्टीकोणातून आयएनएस विशाखापट्टणमचा INS भारतीय नौदलामध्ये समावेश करण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

याच पार्श्वभूमिवर भारतीय नौदलाने या लढाऊ युद्धनौकेची झलक दाखवणारा खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या सेवेमध्ये समाविष्ट होणारी स्वदेशी बनावटीची INS विशाखापट्टणम ही स्टेल्थ गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. आजपासून ही युद्धनौका देशाच्या सेवेत रुजू होणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह INS विशाखापट्टणमच्या जलावतारणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड या ठिकाणी कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान, INS विशाखापट्टणमचे कमांडिंग अधिकारी कॅप्टन बिरेंद्र सिंह यांनी आयएनएस विशाखापट्टनमच्या जलावतारणाकरिता आम्ही सज्ज असल्याचे सांगितले आहे.

तसेच पुढे ते सांगितले आहेत की, या युद्धनौकेच्या बांधणीमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. जलावतारणानंतर आणखी काही चाचण्या होणार आहेत असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT