Infosys  
देश विदेश

Infosys : आता घरातून काम कमी, महिन्यातून १० दिवस ऑफिसला याच, Infosys चा कर्मचाऱ्यांना आदेश

Infosys Work from Office : ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्यातून १० दिवस ऑफिसमध्ये बोलवण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Infosys Work from Office : भारतामधील आघाडीची आयटी कंपनी Infosysने कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम कमी करण्याची तयारी सुरू केली आहे. रिपोर्ट्सनुसार, Infosys ने कर्मचाऱ्यांना महिन्यातून दहा दिवस ऑफिसला येण्याबाबत कळवले आहे. १० मार्च पासून टेक्नॉलॉजी स्टाफमदील प्रत्येकाला महिन्यातून दहा दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करावे लागेल, असे Infosys ने सांगितले आहे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन लागले होते, त्यावेळी रिमोट वर्क, वर्क फ्रॉम होम सुरू झाले होते. मूनलाइटिंगच्या वृत्तानंतर आता Infosys आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवण्याच्या तयारीत आहे.

Infosys कडून हायब्रिड कामाच्या नियमांत बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्यातून १० दिवस ऑफिसमध्ये बोलवण्यात येत आहे. इकॉनमिक टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, Infosys ने टेक्नॉलजी स्टाफला महिन्यातून दहा दिवस ऑफिसमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीकडून त्यासाठी नवीन अटेंडेंस सिस्टम लाँच करत आहे. यापुढे वर्क फ्रॉम होम सिस्टिममधून ऑटोमॅटकली अप्रूव्ह होणार नाहीत.

रिपोर्ट्सनुसार, Infosys कंपनीने प्रत्येक विभागाच्या हेड्सला आपल्या टीममधील सहकाऱ्यांना ईमेल पाठवून महिन्यातून दहा दिवस ऑफिसला बोलवण्यास सांगितले आहे. १० मार्चपासून प्रत्येकाने महिन्यातून दहा दिवस ऑफिसला यावेच लागेल, असे निर्देश Infosys कडून देण्यात आले आहेत. जो कर्मचारी ऑफिसमध्ये अटेंडेंसच्या नियमाचे पालन करणार नाही, त्याची पैसे कपात होतील, अथवा सुट्टीमधून दिवस वजा केला जाईल.

Infosysकंपनीच्या कार्यकारिणीच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांमधील संवाद चांगला राहावा, मतभेद कमी व्हावेत, त्यामुळे कार्यालयात बोलवण्यात येत आहे. काही लोकांच्या मते ऑफिसला ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ आणि थकवा यामुळे समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी खात्यात येणार, मोठी अपडेट आली समोर

Actress Murder: अभिनेत्रीच्या हत्येचे रहस्य उलगडले; पतीने रचलेला 'हा' कट पाहून पोलीसही चक्रावले

Maharashtra News Live Update: खालापूरच्या गारमाळ धनगरवाडीत आजही झोळीचा आधार; बाळंतीण महिलेसह नवजात बाळाला झोळीतून आणण्याची वेळ

Sanjay Raut : "...तर मी राजकारण सोडणार" संजय राऊतांचं सरकारला आव्हान, पहा Video

Bank Closed : मोठी बातमी! लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

SCROLL FOR NEXT