Industrialist Janardhan Rao killed free press
देश विदेश

Industrialist Janardhan Rao: पैशांचा वाद, नातवाने आजोबाला भोसकले, 73 वेळा सपासप केले वार

Industrialist Janardhan Rao killed: मालमत्तेच्या शेअर्सच्या वादावरून आजोबांवर वार केल्याच्या आरोपाखाली २९ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

Bharat Jadhav

मालमत्तेच्या वाटणीवरून झालेल्या वादातून वेलजन ग्रुपचे उद्योजक जनार्दन राव यांची त्यांच्या नातवानेच भोसकून हत्या केलीय. ८६ वर्षीय राव यांच्या २९ वर्षीय किर्ती तेज याने ७३ वेळा वार करत जनार्दन राव यांची हत्या केली. हत्येची ही घटना गुरुवारी रात्री त्यांच्या सोमाजीगुडा येथे घडली. नातू किर्तीच्या चाकू हल्ल्यात त्याची आई देखील जखमी झालीय. मुलाच्या चाकू हल्यातून जर्नादन राव यांना वाचवण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप केला, त्यावेळी त्याही जखमी झाल्यात.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, किर्ती तेजने अमेरिकेतून पदवीत्तराचे शिक्षण घेतलंय. ज्यावेळी उद्योगपती जर्नादन राव यांची हत्या केली त्यावेळी किर्ती आणि त्याची आई सोबत होती. दोघेही जर्नादन राव यांची भेट घेण्यास आले होते. त्यावेळी तेज आणि जनार्दन यांच्यात प्रॉपर्टी शेअर्सच्या वाटणीवरून वाद झाला. नातू किर्तीला मालमत्तेतून योग्य हिस्सा दिला जात नव्हता, त्यामुळे त्याचा त्यांच्या आजोबांवर राग होता.

ET मधील वृत्तानुसार, राव यांनी अलीकडेच आपल्या मोठ्या मुलीच्या मुलाची वेलजन समूहाच्या संचालकपदी नियुक्ती केली होती. त्यांची मुलगी सरोजिनी देवी यांचा मुलगा तेज याला ४ कोटी रुपयांचे शेअर्स देण्यात आले होते. वारसा हक्काच्या मुद्द्यावर दोघामध्ये वाद झाला. तेजने राव यांच्यावर अन्यायकारक वागणूक दिल्याचा आरोप केला, असे वृत्त ईटीने दिले आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, किर्तीने चाकू हिसकावून घेत राव यांच्यावर ७३ वेळा वार करत त्यांची हत्या केली. किर्ती जेव्हा उद्योगपती जर्नादन राव यांच्यावर वार करत होता त्यावेळी त्याची आई सरोजनी देवी ह्या मध्ये आल्या. त्यांनी जर्नादन राव यांना वाचवण्याच प्रयत्न केला. त्या प्रयत्नात सरोजिनी देवीदेखील जखमी झाल्या आहेत. तो घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि शोधमोहीम हाती घेण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

Pune : हृदयद्रावक! आईचा हार्टअटॅकने मृत्यू, २४ तासाच्या आत मुलाने संपवलं जीवन

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT