Viral Resignation Letter, funny resignation letter Saam Tv
देश विदेश

'मला मजा येत नाही' असे लिहून पठ्ठ्यानं दिला राजीनामा; मजेशीर पत्र व्हायरल

हे गंमतीशीर राजीनामा पत्र सोशल मीडियावर चांगलंचं व्हायरल होतं आहे.

Shivani Tichkule

Viral Resignation Letter: आजच्या काळात, लोकांसाठी पैसे कमवण्यापेक्षा नोकरीचे समाधान महत्त्वाचे आहे. म्हणजेच नोकरीत मिळणारे समाधान, आनंद आणि शांती. अनेक लोक नोकरीमुळे इतके त्रस्त होतात की ते डिप्रेशनमध्ये जातात. नोकरी सोडण्याचे धाडस करणारे कमी लोक असतात, कारण नोकरीशिवाय उदरनिर्वाह करणे कठीण असते. (funny resignation letter)

एखाद्या कंपनीतून, संस्थेतून आपल्या पदाचा राजीनामा देणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. राजीनामा देण्यासाठी एक पत्र लिहावं लागतं. जिथं आपण काम करतो त्याठिकाणी आपल्या वरिष्ठांना आपण संबंधीत कंपनी, संबंधीत संस्था अथवा राजकारणात पक्षाचा जरी राजीनामा द्यायचा असेल तर शक्यतो त्यासाठीचं कारण हे आपल्या राजीनामा पत्राद्वारे सांगावं लागतं. जर ते कारण आपल्याला सांगायचं नसेल तरी तसा उल्लेख करावा लागतो. यासाठी ४ ते ५ ओळींचं राजीनामा पत्र लिहीलं जातं. पण, एका पठ्ठ्यानं केवळ १ ओळीमध्ये आपला राजीनामा दिला आहे. हे गंमतीशीर राजीनामा (Resignation) पत्र सोशल मीडियावर चांगलंचं व्हायरल (Viral) होतं आहे.

उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर अनेकदा विचित्र पोस्ट शेअर करत असतात. त्याच्या अनेक पोस्ट व्हायरल होतात. अलीकडेच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे जो राजेश नावाच्या व्यक्तीने ऑफिसमध्ये दिलेला राजीनाम्याचा आहे. साधारणपणे ऑफिसमध्ये पद्धतशीर आणि ठराविक पद्धतीच्या आधारे राजीनामे दिले जातात. पण हर्षने जो फोटो शेअर केला आहे, त्यात त्या व्यक्तीने तो डिझाईन करत असल्याचं अगदी सोप्या शब्दात कारण सांगितलं आहे. राजीनाम्यात राजेश लिहीतो,” प्रिय सर, मी राजीनामा देतोय,मजा येत नाहीये!” या पत्रावर 18 जूनची तारीख आहे. हा विचित्र राजीनामा पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका पठ्ठ्यानं केवळ ३ शब्दांत आपला राजीनामा दिल्याचे पत्र व्हायरल झाले होते. 'Bye Bye Sir' असे कारण देत त्याने आपल्या नोकरीला लाथ मारली आहे. तीन शब्दांचा हा राजीनामा कदाचित जगातला सर्वात लहान आणि कमी शब्दांचा राजीनामा असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

SCROLL FOR NEXT