indore women Saam Tv News
देश विदेश

Crime News: लग्नाच्या पहिल्याच रात्री कौमार्य चाचणी, नंतर हुंड्यासाठी छळ; सासरच्या मंडळींकडून जाच

Indore Woman Faces virginity Test: लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री नवरीची कौमार्य चाचणी करण्यात आलीय. तसेच हुंड्यासाठी छळ करण्यात आला. ही धक्कादायक घटना इंदूरच्या बाणगंगा परिसरात घडली आहे.

Bhagyashree Kamble

लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री नवरीची कौमार्य चाचणी करण्यात आलीय. तसेच महिलेचा सासरच्या मंडळींकडून जाच आणि हुंड्यासाठी छळ करण्यात आला आहे. कौमार्य चाचणी आणि हुंड्यासाठी छळ करण्यात आल्यामुळे महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला होता. ही धक्कादायक घटना इंदूरच्या बाणगंगा परिसरात घडली असून, याच त्रासाला कंटाळून तिने आता दंड थोपटले आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून बाणगंगा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरूद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचा डिसेंबर २०१९ ला भोपाळ येथील तरूणाशी लग्न जुळले. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला मानसिक धक्का बसला. तिची लग्नाच्या पहिल्याच रात्री कौमार्य चाचणी करण्यात आली होती. यासंदर्भात वकील के.के कुन्हारे यांनी सांगितले की, ही प्रथा काही समाजात प्रचलित आहे. मात्र, २१ व्या शतकात ती अंगीकारणे अत्यंत लाजिरवाणे असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे बहुतांश तरूणीला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सहन करावे लागते.

हुंड्यासाठीही केला छळ

कौमार्य चाचणी व्यतिरिक्त तरूणीचा हुंड्यासाठीही छळ करण्यात आला आहे. तसेच गर्भधारणेदरम्यान, तरूणीला ३ महिन्यात गर्भपात आणि नंतर मृत मुलीला जन्म देणं यामुळे तरूणीला शारीरिक त्रास सहन करावा लागला. सध्या पीडित तरूणी एका मुलीची आई आहे.

महिला आणि बालविकास विभागाच्या तपास अहवालात लग्नाच्या पहिल्याच रात्री सासरच्या लोकांनी अमानुष पद्धतीने तरूणीचे कौमार्य तपासले. अयोग्य पद्धतीने तरूणीची कौमार्य चाचणी केली. या चाचणीमुळे पीडितेला मानसिक आणि शारीरिक छळाला सामना करावा लागला आहे.

सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याचे आदेश

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने सासरच्या मंडळींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वकील के.के कुंहारे म्हणाले, अशा प्रथा समाजातील महिलांच्या हक्कांच्या विरोधात आहेत. आताही महिला या घटनांविरोधात आवाज उठवत आहेत, याप्रकरणावरून सिद्ध होते.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT